फोमेन्तोने कचरा न स्वीकारल्यामुळे मडगावात लागल्या राशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 07:43 PM2019-06-17T19:43:30+5:302019-06-17T19:43:35+5:30
तोडग्यासाठी उद्या बैठक शक्य : डंपवर कचरा टाकण्यास कुडतरीच्या नागरिकांचा विरोध
मडगाव: गोव्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या मडगाव शहरातील कचरा प्रक्रिया करण्यासाठी घेण्यास फोमेन्तो ग्रीन या कंपनीने सोमवारी नकार दिल्याने गोळा केलेला कचरा टाकावा कुठे हा गंभीर प्रश्र्न मडगाव पालिकेसमोर उभा राहिला असून फोमेन्तोच्या या भूमिकेमुळे शहरातील एकूणच कचरा उचलीवर परिणाम झाला आहे. कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने कित्येक ठिकाणचा कचरा सोमवारी पडून राहिला. त्यामुळे सायंकाळर्पयत कित्येक भागात दरुगधीचे वातावरण पसरले होते.
मडगावच्या कच:यावर प्रक्रिया करणा:या फोमेन्तो ग्रीन कंपनीने सोमवारपासून मडगाव पालिकेकडून येणारा कचरा स्वीकारणो बंद केल्याने मडगाव पालिकेसमोर आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली. या कंपनीने यापूर्वी सोमवारपासून आपण वर्गीकृत केलेलाच कचरा स्वीकारणार अशी नोटीस पालिकेला दिली होती. मात्र सोमवारी त्यांनी कुठल्याही प्रकारचा कचरा स्वीकारण्यास नकार दिला. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी उद्या मंगळवारी फोमेन्तोच्या अधिका:यांबरोबर चर्चा करण्याचे संकेत नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांनी दिले आहेत.
सोनसडय़ावरील प्लान्टमध्ये मागच्या वीस दिवसांचा टाकाऊ कचरा पडून राहिलेला आहे. त्यामुळे नवीन कचरा घेण्यास प्लान्टमध्ये जागाच उपलब्ध नाही अशी भूमिका फोमेन्तोने घेतली होती. सकाळी 6.30 वाजता मडगाव पालिकेची कच:याची एक पीकअप या प्लान्टवर आली असता, तिला आत सोडण्यात आले नाही. मडगाव पालिकेने कच:याच्या गाडय़ा प्लान्टमध्ये आणू नयेत यासाठी रस्त्याच्या मध्ये पोकलीन ठेवून रस्ता अडविण्यात आला होता. त्याशिवाय प्लान्टची दारेही बंद ठेवण्यात आली होती.
फोमेन्तो कंपनीचे सुदीन पै रायतुरकर यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, प्लान्टमध्ये यापूर्वीच सुमारे हजारभर टन टाकाऊ कचरा पडून राहिेलेला आहे. वास्तविक हा कचरा उचलून नेण्याची जबाबदारी पालिकेची होती. जोर्पयत हा कचरा खाली केला जात नाही तोर्पयत नवीन कचरा घेण्यासाठी आमच्याकडे जागाच उपलब्ध नाही. त्यामुळेच आम्हाला कचरा घेता आला नाही अशी माहिती त्यांनी दिली.
फोमन्तो कंपनीने कचरा स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजल्यानंतर मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई व मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सोनसडय़ावर जाऊन पहाणी केली. सुरुवातीला नगराध्यक्षांनी आम्ही साठून राहिलेला कचरा काढून नेऊ पण तुम्ही आमचा कचरा प्रक्रियेसाठी स्वीकारा अशी विनंती फोमेन्तोच्या अधिका:यांना केली. त्याप्रमाणो कंपनीला पत्रही देण्याची तयारी दाखवली. मात्र नंतर आम्ही केवळ साचलेला कचरा काढून नेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली.
फोमेन्तोच्या या भूमिकेवर नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांनी संताप व्यक्त करताना, फोमेन्तोकडून पूर्ण शहराची अडवणूक करण्यासारखा हा प्रकार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कंपनीकडे जो करार केला आहे त्याप्रमाणो, कंपनी कचरा स्वीकारण्यास मज्जाव करु शकत नाही. साठून राहिलेला कचरा बाहेर काढण्याची आमची तयारी आहे. मात्र फोमेन्तोने नवीन कचरा स्वीकारायलाच पाहिजे असे त्या म्हणाल्या.
शहरात कित्येक ठिकाणी कचरा पडून
मडगाव पालिकेने रविवारपासून केवळ वर्गीकृत केलेलाच कचरा स्वीकारण्याची मोहीम सुरु केलेली असताना सोमवारी फोमेन्तोने कचरा स्वीकारण्यास मनाई केल्यानंतर त्याचा परिणाम शहरातील एकूणच कचरा उचलीवर झाला. उचललेला कचरा टाकण्यास जागाच उपलब्ध नसल्याने कित्येक ठिकाणचा कचरा उचललाच गेला नाही. त्यामुळे बाजारात कित्येक ठिकाणी कच:याच्या राशी पडून होत्या.
सोमवारी सकाळी कच:याच्या गाडय़ा सोनसडो डंपवर खाली करण्याचा प्रयत्नही पालिकेने करुन पाहिला. मात्र कुडतरीतील काही लोक तिथे आल्यामुळे शेवटी हा निर्णय रद्द करण्यात आला. कुडतरीचे रुई मिनेझीस यांनी आम्ही कुठल्याही परिस्थितीत वर्गीकृत न केलेला कचरा सोनसडय़ाच्या डंपवर टाकायला देणार नाहीत असे स्पष्ट करताना, गरज पडल्यास आम्ही उपोषणही करु असा इशारा दिला.
मनोविकासवर लक्ष ठेवा
दरम्यान, सोनसडय़ाच्या आगीमुळे हा सर्व परिसर प्रदुषित झाल्यामुळे त्या प्रदुषणाचा या भागातील मनोविकास शाळेतील विद्याथ्र्यावर कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या असे आवाहन चर्चिल आलेमाव यांनी केले. दरम्यान, या प्रदुषणामुळे दोन आठवडे शाळेची सुरुवात लांबणीवर पडली होती.ती शाळा आज सोमवारपासून सुरु झाली.