काजू महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दिव्या राणेंचे विधानसभेत अभिनंदन
By पूजा प्रभूगावकर | Updated: July 15, 2024 17:35 IST2024-07-15T17:34:48+5:302024-07-15T17:35:18+5:30
पणजी: राज्य काजू महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल पर्येच्या आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांचे ...

काजू महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दिव्या राणेंचे विधानसभेत अभिनंदन
पणजी: राज्य काजू महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल पर्येच्या आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांचे सोमवारी विधानसभेत अभिनंदन करण्यात आले.
सभापती रमेश तवडकर यांनी हा अभिनंदन करणारा ठराव सभागृहात सादर केला होता. डॉ. राणे यांनी राज्य काजू महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे करणे तसेच एकूणच त्यांच्या दूरदृष्टीमुळे व प्रयत्नांमुळे काजू उत्पादन क्षेत्राचा साधलेला विकास यासाठी सभागृह त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सभापतींनी ठराव सादर करताना नमूद केले.
डॉ. राणे म्हणाल्या, की सभापती तवडकर व सभागृहाच्या अन्य सदस्यांनी आपल्या अभिनंदनाचा ठराव सादर करण्यासाठी त्यांचे आभार मानत आहे. काजू महोत्सवाचे मागील दाेन वर्षापासून यशस्वीपणे आयाेजन केले जात आहे. या महाेत्सवाला मिळालेल्या एकूणच प्रतिसादामुळे आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.