गोवा - दाबोळी विमानतळावर ४३ लाख ७० हजार रूपयाचे परकीय चलन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 07:20 PM2018-01-08T19:20:41+5:302018-01-08T19:21:02+5:30

गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले.

foreign currency of 43 lakh 70 thousand seized in Daboli airport | गोवा - दाबोळी विमानतळावर ४३ लाख ७० हजार रूपयाचे परकीय चलन जप्त

गोवा - दाबोळी विमानतळावर ४३ लाख ७० हजार रूपयाचे परकीय चलन जप्त

Next

वास्को : गोवा - दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाºयांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद हालचालीवरून दोन प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ४३ लाख ७० हजार रूपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात यश मिळविले.
सीमा शुल्क संचालनालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी मुरगाव हार्बर येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली. एक आंतरराष्ट्रीय आणि एक देशी प्रवाशी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ओमन एअरव्हेज विमानाने दुबईला जाण्यासाठी आले होते. या विमान तळावरून सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याने या विमानतळावरील सीमा शुल्क संचालनालयाचे हवाई गुप्तहेर अधिकारी सतर्कता बाळगून होते़ या विभागाचे सहाय्यक आयुक्त जी़बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली हवाई गुप्तहेर प्रवाशांच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. त्यांना कक्षामध्ये सदर दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद दिसल्यामुळे या अधिकाºयानी या दोन्ही प्रवाशाना अडविले आणि त्याच्या जवळ असलेल्या बॅगेची झडती घेतली असता या दोन्ही प्रवाशांकडे सुमारे ४३ लाख ७० हजार रूपयांचे परकीय चलन सापडले. विमानात चढण्यापुर्वी या प्रवाशाच्या सामानाची तपासणी झाली होती. या दोन्ही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानी हे परकीय चलन दुबईला तस्करीमार्गाने नेत असल्याची कबुली दिली. सीमा शुल्क अधिकाºयानी सदर चलन कस्टम कायदा आणि फे मा कायद्याखचाली जप्त केलेले आहे. सीमा शुल्क संचालनालयाचे आयुक्त आऱ मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संपूर्ण कारवाई करण्यात आली असून त्याची पुढील चौकशी चालु आहे.

Web Title: foreign currency of 43 lakh 70 thousand seized in Daboli airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.