जंगलातील आगीचा धग गोवा विधानसभेत; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
By वासुदेव.पागी | Published: July 27, 2023 12:24 PM2023-07-27T12:24:40+5:302023-07-27T12:25:01+5:30
अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याचीमाहिती वनमंत्र्यांनी दिली.
पणजी - मे महिन्यात गोव्यातील विविध जंगलात भडकलेल्या आगकांडावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढविला. जंगलातील जमिनीवर बिल्डरलॉबीचा डोळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
या आग दुर्घटना नेसर्गिक किंवां अपघाती नसून मानवीकृत्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते याची आठवण विजय सरदेसाई यांनी सभागृहात वनमंत्र्यांनी करून दिली. तसेच आमदार कार्लुस फेरेरा यांनी उपप्रश्न विचारताना या अग्नीकांडात बिल्डरलॉबीचा हात आहे का असा प्रश्न केला. कार्लुस यांच्या प्रश्नावर वनमंत्री संतापले. कोणत्याही पुराव्याशिवाय असे आरोप कसे काय करू शकता असा प्रश्न त्यांनीविचारला. त्याचबरोबर या विषयावर काही वृत्तपत्रांनी बेजबाबदारपणे लिखाण करूनलोकांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनेक ठिकाणी भडकलेल्या आगीत एकूण ४८० हेक्टर वनजमिनीत आग भडकल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली. त्यात ३०० हून अधिक हेक्टर जमिनी या दाट जंगलाच्या होत्याअसेही त्यांनी सांगतले.
तुम्ही सांगता ते करणार नाही
वनमंत्री विश्वजित आणि विरोधीपक्षनेते यांची जंगलातील अग्नीकांडाच्या मुद्यावरून बराच वादविवाद झाला. ज्या जंगलात आग भडकली ती जंगले बांधकाम निषिद्धविभागात (एनडीझेड) येतात असे त्यांनी वनमंत्र्यांना सांगितले तेव्हा वनमंत्र्यांनी त्यांना वनखाते हे केंद्रीय वनमंत्रालयाच्या कायद्याने चालत असल्याचे सांगितले. तुम्ही त्याबाहेरचे जर सांगत असाल तर तुमचे काहीच मी ऐकणार नाही असे त्यांनी युरींना सुनावले.