CoronaVirus News: गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक कोविड पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 03:51 PM2020-08-21T15:51:23+5:302020-08-21T15:52:55+5:30
असिम्प्टोमॅटिक असल्याने नाईक यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पणजी : फोंड्याचे काँग्रेसी आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. असिम्प्टोमॅटिक असल्याने त्यांना घरीच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यापूर्वी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, आमदार चर्चिल आलेमांव, आमदार सुदिन ढवळीकर तसेच उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. श्रीपाद नाईक सध्या मणिपाल इस्पितळात उपचार घेत असून सुदिन ढवळीकर हेही इस्पितळात दाखल आहेत. श्रीपाद त्यांच्यावर प्लाजमा थेरपी उपचार झालेली आहे.