माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचे तब्बल ७0 कोटींचे जमीन प्रकरण लोकायुक्तांसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:10 PM2018-10-22T19:10:50+5:302018-10-22T19:11:31+5:30

गोव्यात अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाप्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची ७0 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केल्याचे प्रकरण आता लोकायुक्तांकडे पोहोचले आहे.

Former MLA Subhash Shirodkar has assets worth Rs 70 crore in front of Lokayuktas | माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचे तब्बल ७0 कोटींचे जमीन प्रकरण लोकायुक्तांसमोर

माजी आमदार सुभाष शिरोडकर यांचे तब्बल ७0 कोटींचे जमीन प्रकरण लोकायुक्तांसमोर

Next

पणजी : गोव्यात अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन तसेच काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाप्रवेश केलेले सुभाष शिरोडकर यांची ७0 कोटींची जमीन सरकारने कोणतेही कारण न दाखवता खरेदी केल्याचे प्रकरण आता लोकायुक्तांकडे पोहोचले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांनाही या तक्रारीत प्रतिवादी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांनी मुख्य सचिवांना नोटिसही बजावली असून या व्यवहारांबाबतचा संपूर्ण तपशील मागितला आहे. 

समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी यासंबंधीची तक्रार लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्याकडे सादर करताना हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. आमदारकी तसेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपप्रवेश केलेले शिरोडकर यांना या व्यवहारातून सरकारने कसा फायदा करुन दिला याची माहिती लोकायुक्तांसमोर त्यानी ठेवली आहे. शिरोडा येथील लागवडीखालील तब्बल १ लाख ८३ हजार ५२४ चौरस मिटर जमीन सरकारने ७0 कोटी रुपयांना विकत घेतली. शिरोडकर व त्यांचे तीन बंधू अमित, उमेश आणि सत्तेश यांच्या वेदांता रिअल इस्टेट डेव्हलोपर्सने ही जमीन १९ आॅक्टोबर २00६ रोची केवळ ४५ रुपये प्रति चौरस मीटर दराने विकत घेतली होती. सरकारने हीच जमीन शिरोडकर यांच्याकडून आता ३,५00 रुपये प्रती चौरस मिटर दराने घेतली. बाजारदरापेक्षाही जास्त किंमत शिरोडकर यांना या जमिनीसाठी सरकारने दिली. शिरोडा येथे अन्य एका जमीन मालकाने ५ एप्रिल २0१८ रोजी सरकारला प्रस्ताव पाठवून आपली १ लाख ४0 हजार ६५0 चौरस मीटर जमीन केवळ ३५0 रुपये प्रती चौरस मीटर या दराने देऊ केली होती परंतु सरकारने कमी रकमेची ही जमीन नाकारुन शिरोडकर यांची महागडी जमीन विकत घेतली. 

सरकार जेव्हा कोणतीही जमीन संपादित करतो तेव्हा सबळ कारण द्यावे लागते. शिरोडकर यांची जमीन उद्योग खात्याने घेतली आहे परंतु कोणत्या कामासाठी ती घेतली. याबाबत काहीच कारण दिलेले नाही. महागडी जमीन खरेदी करुन एकाअर्थी शिरोडकर यांना भाजपाप्रवेशासाठी लांच देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकायुक्तांसमोर या प्रकरणी पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

Web Title: Former MLA Subhash Shirodkar has assets worth Rs 70 crore in front of Lokayuktas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा