मनपाचे माजी नगरसेवक रत्नाकर फातर्पेकर यांचे निधन
By पूजा प्रभूगावकर | Published: April 2, 2024 04:40 PM2024-04-02T16:40:09+5:302024-04-02T16:40:44+5:30
फातर्पेकर हे २०१३ ते २०१७ या काळात प्रभाग १८ मधून नगरसेवक म्हणून मनपात दाखल झाले होते.
पणजी: पणजी महानगरापलिकेचे (मनपा) माजी नगरसेवक रत्नाकर फातर्पेकर (६०)यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते.त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त होत आहे.
फातर्पेकर हे २०१३ ते २०१७ या काळात प्रभाग १८ मधून नगरसेवक म्हणून मनपात दाखल झाले होते. पणजी मार्केट समितीच्या अध्यक्षपदी सुध्दा ते होते. एक सक्रीय नगरसेवकांपैकी ते एक होते. प्रभागात त्यांनी अनेक विकास कामांना चालना दिली होती. मनपाचे विद्यमान नगरसेवक तथा माजी महापौर उदय मडकईकर यांच्या विरोधात त्यांनी २०२१ सालची मनपा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.
फातर्पेकर हे काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे ते सक्रीय राजकारणापासून दूरच होते. सोमवारी त्यांची तब्येत बिघडली असता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी आहे. फातर्पेकर यांच्या पार्थिवार मंगळवारी सांतिनेझ पणजी येथील मोक्ष स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पणजी मनपाचे आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.