भाजपच्या चार मंत्र्यांचा आज शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:59 PM2019-07-11T19:59:10+5:302019-07-11T19:59:19+5:30

भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी गुरुवारी दिल्लीस जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्जही भरले.

Four BJP ministers today swear in | भाजपच्या चार मंत्र्यांचा आज शपथविधी

भाजपच्या चार मंत्र्यांचा आज शपथविधी

Next

पणजी : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी गुरुवारी दिल्लीस जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्जही भरले. भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून आज सायंकाळी शपथविधी होणार आहे.
कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने हे विलीनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली. काँग्रेसमधील दहा आमदार एकदम पक्षातून बाहेर येण्याची ही दुसरी घटना आहे. 
कवळेकर हे उपमुख्यमंत्री असतील. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आज शुक्रवारी मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल. त्या दृष्टीने मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची गुरुवारी दिल्लीत शहा यांच्याशी चर्चा झाली. दहा आमदार भेटण्यापूर्वी अगोदर सावंत व तेंडुलकर यांनी शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. रोहन खंवटे यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाईल. दिल्लीला गेलेले सगळे नेते आज शुक्रवारी सकाळी गोव्यात परततील.
दरम्यान, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी टीकेचा सूर लावला आहे. दहा काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देणे उत्पलना रुचले नाही. पर्रीकर यांनी घालून दिलेल्या आदर्शापासून आताच्या भाजपाने फारकत घेतली आहे, अशी प्रतिक्रिया उत्पलने व्यक्त केली.

 

Web Title: Four BJP ministers today swear in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.