गोव्यात बेपत्ता झालेल्या चार मुली अखेर सापडल्या, पाच युवकांना अटक
By सूरज.नाईकपवार | Published: October 26, 2023 04:36 PM2023-10-26T16:36:34+5:302023-10-26T16:38:45+5:30
२४ ऑक्टोबर रोजी या मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यासंबधी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंद झाल्यानतंर पोलिसांनी तपासकामाला प्रारंभ केला
मडगाव - गोव्यातील दक्षिण गोवा येथील मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या चार मुलींना पोलिसांनी शाेधून काढले. यातील तीघेजण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी पाच संशयितांनाही अटक केली आहे. अपहरण म्हणून पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. संशयितांविरोधात भादंसंच्या ३७३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी या मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यासंबधी मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंद झाल्यानतंर पोलिसांनी तपासकामाला प्रारंभ केला. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी तपासकामाला प्रारंभ करुन त्या मुलींचा व संशयितांचा शोध लावला. देमेतियस फर्नांडीस(१८) , काइमिक्स कुतिन्हो (१९) , मोविन कुतिन्हो (१८) , नोवेल फर्नांडीस ( १९) व अझिम अहमद (२१) अशी संशयितांची नावे आहेत. त्या मुलींना संशयितांनी नुवे येथील डोंगरावरील एका निर्जनस्थळी नेले होते. त्या मुलींना ताब्यात घेतल्यानतंर पोलिसांनी त्यांची वैदयकीय तपासणीही केली. त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही