सामूहिक बलात्कार प्रकरणी चौथ्या संशयिताला अटक
By admin | Published: August 6, 2015 02:29 AM2015-08-06T02:29:37+5:302015-08-06T02:29:46+5:30
पणजी : खोर्ली येथे ३० वर्षीय युवतीवरील बलात्कार प्रकरणात जुने गोवा पोलिसांकडून रिकेश शिरोडकर या संशयिताला अटक करण्यात आली आहे
पणजी : खोर्ली येथे ३० वर्षीय युवतीवरील बलात्कार प्रकरणात जुने गोवा पोलिसांकडून रिकेश शिरोडकर या संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर इतर चौघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना यापूर्वी अटक
करण्यात आली आहे.
खोर्ली-जुने गोवे येथे घडलेल्या या प्रकारात गोवा पोलीस खात्यातील योगेश खांडेपारकर या कॉन्स्टेबलनेच पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे ड्युटीच्या वेळेतच त्याने हा गुन्हा केला होता. बुधवारी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश पोलीस खात्यातून काढण्यात आला. युवतीला आपल्या खोर्ली येथील फ्लॅटवर नेऊन तिच्यावर त्याने व त्याच्या इतर ७ साथिदारांनी बलात्कार केला होता. या प्रकरणात योगेशसह मंगेश काणकोणकर व विक्रम काणकोणकर यांना अटक करण्यात आली होती. चौथा संशयित रिकेश शिरोडकर हा बुधवारी पोलिसांच्या तावडीत सापडला.
पीडित युवती मूळ बेळगाव येथील असून मेरशी येथे ती राहायला होती. तेथेच एका महिलेच्या घरी ती मोलकरीण म्हणून काम करीत होती. पोलिसांनी घराच्या मालकिणीकडूनही या बाबतीत माहिती घेतली. युवतीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)