फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 09:09 PM2018-12-01T21:09:14+5:302018-12-01T21:09:43+5:30

पणजी - राज्यातील खनिज खाणी लवकर सुरू होण्यासाठी केंद्र सरकारने लवकर पाऊले उचलायला हवीत व त्यासाठी तुम्ही काही तरी ...

Francis Lobon avoided meeting the chief minister | फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार

फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार

Next

पणजी - राज्यातील खनिज खाणी लवकर सुरू होण्यासाठी केंद्र सरकारने लवकर पाऊले उचलायला हवीत व त्यासाठी तुम्ही काही तरी करा, असा आग्रह भाजपच्या आमदार व मंत्र्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्याकडे धरण्यात आला. मुख्यमंत्री खाणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलतील. तथापि, भाजपचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि उपसभापती मायकल लोबो यांनी  बैठकीला जाणो व मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले.

र्पीकर यांनी करंजाळे येथील त्यांच्या निवासस्थानी भाजपच्या सर्व मंत्री व आमदारांची शनिवारी सायंकाळी बैठक घेतली. पंचायत मंत्री व भाजपचे दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले, की खनिज खाणप्रश्नी व मतदारसंघांतील विकास कामांविषयी आणि प्रशासकीय समस्यांविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. बंद असलेल्या खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात व त्यासाठी केंद्राने प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. कोणत्या पद्धतीने खाणी सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे हे सर्वाना कळायला हवे. केंद्राकडील शब्दाची आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी लवकरच हा विषय केंद्रासमोर मांडण्याची तयारी दाखवली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भाग घेतला. खाणप्रश्नी मुख्यमंत्री लवकरच पंतप्रधानांशी बोलतील असे तेंडुलकर यांनी सांगितले. नोकर भरती मार्गी लावावी, मतदारसंघांतील कामे लवकर करावीत अशा प्रकारची चर्चा बैठकीत झाली. आपण आजारी असल्याने कामांबाबत कोणत्या अडचणी येतात हे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराकडून जाणून घेतले, असे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य आदींचे मानधन वाढविण्याच्या विषयावर चर्चा झाली. प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळ बैठकीत येईल, असे गुदिन्हो यांनी सांगितले. पूर्वीपेक्षा र्पीकर आता आरोग्याने आपल्याला खूप चांगले दिसले असे गुदिन्हो म्हणाले पण ते सचिवालयात कधी परततील असे पत्रकारांनी विचारताच गुदिन्हो यांनी त्यावर उत्तर देणो टाळले.

पाच आमदार अनुपस्थित

भाजपकडे एकूण चौदा आमदार आहेत. पाच आमदार बैठकीस अनुपस्थित राहिले. त्यापैकी पांडुरंग मडकईकर व फ्रान्सिस डिसोझा हे आजारी आहेत. डिसोझा यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला जायचे नाही असे अगोदरच ठरवले होते. त्यामुळे ते बैठकीला गेले नाहीत. शिवाय त्यांना आरोग्यही हवे तसे साथ देत नाही. लोबो यांचा केपे येथे एक कार्यक्रम ठरला होता. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपेक्षाही लोबो यांनी केपेतील विद्यार्थी व पालकांसोबतचा त्यांचा कार्यक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला व बैठकीस येणो टाळले.मंत्री विश्वजित राणो व आमदार ग्लेन तिकलो हे गोव्याबाहेर आहेत. तथापि, राणो व तिकलो यांनी र्पीकर यांना शुक्रवारी व्यक्तीश: भेटून आपण गोव्याबाहेर जाणार असल्याने बैठकीला पोहचू शकणार नाही याची कल्पना दिली होती. नोकर भरती मार्गी लावावी असा मुद्दा विश्वजित यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता.

Web Title: Francis Lobon avoided meeting the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.