सरकारकडून फसवणूक
By admin | Published: February 21, 2015 02:18 AM2015-02-21T02:18:25+5:302015-02-21T02:19:20+5:30
बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी
बार्देस : सुरक्षा रक्षकांची भाजप सरकारने आतापर्यंत फसवणूकच केल्याचा आरोप कामगार नेते अॅड. अजितसिंग राणे आणि स्वाती केरकर यांनी शुक्रवारी येथे केला. निवडणुकीसाठी सुरक्षा रक्षकांना वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.
सकाळी ११.३० वा. श्री बोडगेश्वर मंदिराकडून हुतात्मा चौकाला वळसा घेऊन टॅक्सी स्थानकावर सुमारे ३५० सुरक्षा रक्षकांनी मोर्चा काढून सभा घेतली. या वेळी राणे व केरकर यांनी मार्गदर्शन केले.
अॅड. राणे यांनी सांगितले, की पूर्वी भाजपचे सरकार काही वर्षे होते. त्या वेळी आरोग्यमंत्री सुरेश आमोणकर यांनी लोकल भरती व रोजगार सोसायटी या नावे एक सोसायटी स्थापन केली होती आणि त्या वेळी सुरक्षा रक्षकांना कायम करण्याचे आश्वासन दिले होते; पण १४ ते १५ वर्षे झाली तरी त्यावर काहीच केले नाही. त्यांना फक्त राबवून घेतले.
त्यानंतर गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ सरकारने स्थापन केले; पण त्यातूनही कामगार वर्गाचा फायदा झाला नाही. भाजप सरकारने फक्त यातून लोकांच्या तिजोरीतून आपली मतपेटी तयार केली आणि इतर लोकांबरोबरच युवा-युवतींची फसवणूक केली आणि त्यांना नोकरी कायम करण्याचे आश्वासन देऊन निवडणुकीवेळी फक्त त्यांची मते घेतली आणि दिलेली आश्वासने विसरले. या वेळी काँग्रेस पक्षाचे म्हापसा गटाध्यक्ष विजय भिकेही उपस्थित होते. त्यांनी त्यांना आपला पाठिंबा दिला.
सभेनंतर या सर्वांनी म्हापसा शहरात रॅली काढून सह्यांची मोहीम सुरू केली. त्या वेळी त्यांनी ५ हजार सह्यांचे टारगेट होते ते ७५०० एवढे झाले. तसेच सरकारचा पैसा या आंदोलनासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी आर्थिक मदतीसाठीही लोकांकडे फंडपेटी फिरविली, त्यास त्यांना चांगला प्रतिसाद लाभला.
(प्रतिनिधी)