एचआयव्ही बाधितांच्या शाळा प्रवेशाबद्दल शुक्रवारी निवाडा

By admin | Published: September 16, 2014 01:18 AM2014-09-16T01:18:13+5:302014-09-16T01:22:15+5:30

ग्रीनगोवा फाउंडेशनचा अर्ज : मानवी हक्क आयोगाची स्वेच्छा याचिका

Friday judgment on admission to HIV-infected schools | एचआयव्ही बाधितांच्या शाळा प्रवेशाबद्दल शुक्रवारी निवाडा

एचआयव्ही बाधितांच्या शाळा प्रवेशाबद्दल शुक्रवारी निवाडा

Next

मडगाव : एचआयव्ही बाधित मुलांना शाळेत प्रवेश नाकारल्याबद्दल मानवी हक्क आयोगाने रिवणच्या फातिमा हायस्कूलविरुध्द दाखल करून घेतलेल्या स्वेच्छा याचिकेवर १९ सप्टेंबर रोजी निवाडा दिला जाणार आहे. या प्रकरणात आयोगासमोर संपूर्ण घटनाक्रम सादर झालेला नाही, असा दावा ग्रीनगोवा फाउंडेशन संस्थेने केलेला आहे. तसेच निवाड्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे.
आश्रमातील २७ मुलांना रिवण येथील फातिमा हायस्कूलमध्ये सामावून घेण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर या आश्रमातील एचआयव्ही बाधीत १३ मुलांना अन्यत्र हलविले होते. एचआयव्ही बाधितांसंदर्भातील माहिती उघड केल्यामुळे या घटनेची मानवी हक्क आयोगाने दखल घेतली होती. या संदर्भात सुनावणी चालू होती. ही सुनावणी जरी पूर्ण झाली तरी संपूर्ण माहिती आयोगासमोर उघड झालेली नाही, असे या फाउंडेशनचे मत आहे. नित्य सेवा निकेतनच्या प्रमुख संचालक सिस्टर आफोंसा कोराथूर या या घटनाक्रमातील महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. तरीही अजून त्यांचीही साक्ष आयोगाने घेतली नाही, याकडे फाउंडेशनने लक्ष वेधले आहे.
या प्रकरणात नित्य सेवा निकेतनासह गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था या संस्थानाही वादी करून घेण्याची गरज असल्याचे या अर्जात म्हटले आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत आणि एचआयव्ही बाधित मुलांना शाळेत प्रवेश नाकारण्यात येणार नाही, अशी हमी फातिमा हायस्कूलकडून नित्य सेवा निकेतनला देण्याची गरजही अर्जात व्यक्त केली आहे. या शाळा भरतीच्या प्रकरणाने जून व जुलैमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. एचआयव्ही बाधित मुलांना सामान्य मुलांबरोबर वर्गात सामावून घेवू नये यासाठी गावच्या लोकांनी फातिमा हायस्कूलवर दबाव आणल्याने शेवटी या प्रकरणात शिक्षण खात्याला मध्यस्थी करावी लागली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Friday judgment on admission to HIV-infected schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.