दोनापावला येथील विक्रेत्यांच्या मागण्या सोमवारपर्यंत पूर्ण करा, अन्यथा..., काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:59 PM2023-12-01T15:59:31+5:302023-12-01T16:00:19+5:30
शुक्रवारी दोनापावला येथील जेटीची काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टोन डिकॉस्टा, आमदार कार्लूस फेरेरा तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत पाहणी करुन स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा दिला.
- नारायण गावस
पणजी: दोनापावला जेटीवर असलेल्या स्थानिक विक्रत्यांचे योग्य पुर्नवसन करावे तसेच दोनापावला जेटीवर असलेली तपासणी गेट काढावी. त्याचप्रमाणे स्थानिक बसेसना आता येण्यास द्यावे. अशा या स्थानिक विक्रेत्यांच्या मागण्या सरकारने सोमवार पर्यंत मान्य केल्या नाहीतर काँग्रेस पक्ष दोनापावला जेटीवर आंदोलन करणार, असे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. शुक्रवारी दोनापावला येथील जेटीची काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टोन डिकॉस्टा, आमदार कार्लूस फेरेरा तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत पाहणी करुन स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा दिला.
हे भाजप सरकार स्थानिक गोमंतकीयांचा व्यावसाय नष्ट करु पाहत आहे. दोनापावला जेटीसाठी ४ कोटी रुपये खर्च केले. पण अजूनही ही जेटी अपूर्ण आहे. या ठिकाणी दोनापावलाचे पुतळा बांधला नाही. तसेच कोरोना काळात या ठिकाणी असलेल्या स्थानिक विक्रेत्यांचे योग्य पुर्नवसन केले नाही. या सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही असा अरोपही यावेळी अमित पाटकर यांनी केला.
ताबडतोब गेट काढा
दोनापावला पर्यटनस्थळी लावण्यात आलेली गेट ही सर्वंना अडणच भासत आहे. या गेटमुळे स्थानिक विक्रेत्यांना फटका बसत आहे. तसेच या ठिकाणी प्रती व्यक्ती ५० रुपये आकारले जात असल्याने पर्यटक आता जास्त येत नाही. तसेच स्थानिक बसेस आत येत नसल्याने याचा फटका स्थानिकांना बसत आहे. तसेच या विक्रेत्यांचे योग्य असे अजून पुर्नवसन करुन दिले नाही. मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्र्यांनी याची दखल घेऊन या स्थानिक विक्रेत्यांचा प्रश्न सोडवावा, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
स्थानिक विक्रेत्यांना न्याय द्या
स्थानिक विक्रेते हे गेली अनेक वर्षापासून येथे व्यावसाय करत आहेत. आज पर्यटन येतात म्हणून त्यांचा व्यावसाय चालत आहे. सरकारला त्यांना सरकारी नोकरी देता येत नाही निदान त्यांचा व्यवसाय तरी संकटात आणू नये, त्यांना यात प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्या, असे आमदार कार्लोस फरेरा यांनी सांगितले.