'मनोहारी' पर्वाचा अंत; पर्रीकर अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:02 PM2019-03-18T18:02:21+5:302019-03-18T18:02:45+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते.
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सायंकाळी पर्रीकर यांच्यावर साश्रृनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेतही अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून पर्रीकर अत्यवस्थ होते. अखेर रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी पर्रीकरांचे पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पर्रीकरांची अंत्ययात्रा निघाली.
Panaji: Visuals from the last rites ceremony of late Goa Chief Minister #ManoharParrikar. pic.twitter.com/LrdsXHmRuB
— ANI (@ANI) March 18, 2019
मिरामार येथील समुद्रकिनाऱ्यावरील मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराकडून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.