केंद्रीय चौकशी पथकाच्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 06:50 PM2020-01-13T18:50:04+5:302020-01-13T18:50:42+5:30
गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले.
पणजी : चार वाघांच्या हत्त्ये प्रकरणी चौकशी करून केंद्रीय पथक माघारी परतले आहे. या पथकाने प्रत्यक्ष म्हादई अभयारण्यालाही भेट दिली व आरोपींनाही अनेक प्रश्न केले. या पथकाचा अहवाल आल्यानंतरच गोव्यात यापुढे व्याघ्र प्रकल्प साकारण्याची गरज आहे की नाही ते स्पष्ट होणार आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालावर नियोजित व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य ठरेल.
गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादई अभयारण्यात एका वाघिणीला आणि तिच्या तीन बछडय़ांना विष घालून मारले गेले. स्थानिक धनगर कुटूंबातील दुभत्या जनावरांवर वाघांनी अगोदर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे धनगर कुटूंबातील व्यक्तींनी विष घालून वाघांचा जीव घेतला. या प्रकरणी कुटूंबातील पाच पुरुषांना अटक झाली आहे. तिघापैकी दोघा बछडय़ांना संशयीत आरोपींकडून पुरण्यात आले होते. या प्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने दोघा वरिष्ठ अधिका:यांचे पथक नेमले. हे पथक गोव्यात आले. त्यांनी गोव्याच्या प्रधान मुख्य वनपालासह अन्य वन अधिका:यांची भेट घेतली. म्हादई अभयारण्यात प्रत्यक्ष कुठे वाघांना पुरण्यात आले होते तेही या पथकाने जाऊन पाहिले. पथकाचा अहवाल पुढील पाच दिवसांत येणो अपेक्षित आहे.
दरम्यान, म्हादई अभयारण्य हे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. त्यात एकूण चार मोठे वाघ होते. त्यातील वाघिणीचा मृत्यू झाल्याने आता तीन वाघ शिल्लक राहिले आहेत. हे वाघ बाजूच्या कर्नाटकमधील भीमगड अभयारण्यातूनही गोव्यात येतात. गोव्यात व्याघ्र प्रकल्प साकारायला हवा अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. दुस:याबाजूने स्थानिक आमदार व राज्याचे उद्योग मंत्री विश्वजित राणो यांनी व्याघ्र प्रकल्प राबविण्यास विरोध केला आहे. व्याघ्र प्रकल्प राबविल्यास आपल्या मतदारसंघात विकास कामांना खिळ बसेल असे ते म्हणाले. मात्र केंद्रीय चौकशी पथकाने गोव्याहून निघण्यापूर्वी स्थितीचा अभ्यास केलेला असल्याने काही प्रमाणात त्या अहवालावर व्याघ्र प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असेल.