भवितव्य उद्या

By admin | Published: September 9, 2015 02:15 AM2015-09-09T02:15:59+5:302015-09-09T02:16:10+5:30

पणजी : आनंद वाचासुंदर यांना जामिनावर सोडल्यास त्यांच्याकडून साक्षिदारांवर दबाव टाकण्यासाठी प्रयत्न होणार, अशी भीती त्यांच्या जामीन अर्जावरील

Future tomorrow | भवितव्य उद्या

भवितव्य उद्या

Next

 विशेष न्यायालयातील सुनावणीदरम्यान क्राईम ब्रँचकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या अर्जावर गुरुवारी निवाडा होणार आहे.
आनंद वाचासुंदर याच्या जामीन अर्जावर मंगळवारी उभय बाजूने युक्तिवाद झाले. क्राईम ब्रँचच्या
वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. राजीव गोम्स यांनी वाचासुंदर यांना जामीन देण्यास हरकत घेतली.
तपासकाम अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे आणि अशावेळी त्यांना मोकळे सोडल्यास ते तपासकामात अडथळा आणतील. साक्षिदारांवर दबाव आणतील आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतील, असा
दावा त्यांनी केला.
यापूर्वी विशेष न्यायालयाने वाचासुंदर यांना जामीन नाकारला होता. आताही त्यावेळच्या परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नसल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
क्राईम ब्रँचचा दावा खोडून काढताना वाचासुंदर यांच्या वकिलांनी पोलिसांकडे या प्रकरणात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. वाचासुंदर यांची लाच प्रकरणात कोणतीही भूमिका नाही, त्यांनी पैसे घेतलेही नाहीत आणि दिलेही नाहीत, क्राईम ब्रँचच्याच तपासातून ते स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत पैसे दिले गेले याचा अर्थ त्यांनी केवळ
बघ्याची भूमिका घेतली होती,
हे स्पष्ट झाले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Future tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.