जी- २० आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला गोव्यात प्रारंभ
By किशोर कुबल | Published: April 17, 2023 12:35 PM2023-04-17T12:35:37+5:302023-04-17T12:36:48+5:30
- उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उपस्थिती
किशोर कुबल, पणजी : जी- व्टेंटी परिषदेला गोव्यात प्रारंभ झाला असून आज दुसऱ्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन येथे झाले.
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक चालू आहे. उद्घाटनाला केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, या बैठकीतील विचारमंथनामुळे भविष्यातील आरोग्य आणीबाणी, संशोधन आणि विकासाचे नेटवर्क तसेच उत्पादन व्यवस्थापित करण्यासाठी उपयोग होईल. भारताचे जी व्टेंटी प्राधान्यक्रम सुधारणा बहुपक्षीयतेवर लक्ष केंद्रित करतात.’ श्रीपाद नाईक म्हणाले की, ‘भारत वैद्यकीय पर्यटन निर्देशांकात दहाव्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय पर्यटनासाठी १.८ दशलक्ष विदेशी लोक भारतात आले. आरोग्य आणि निरोगी पर्यटनाला प्रोत्साहन द्यायला हवे.’
१९ तारीखपर्यंत पुढील तीन दिवस गोव्यात ही परिषद चालणार असून जी व्टेंटीतील सदस्य देश, दहा निमंत्रित राष्ट्रे आणि २२ आंतरराष्ट्रीय संस्थांमधून २०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"