गांधी जयंती सुटीचे गौडबंगाल!

By admin | Published: March 16, 2015 01:38 AM2015-03-16T01:38:30+5:302015-03-16T01:43:11+5:30

पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याच्या वृत्ताने रविवारी

Gandhi Jayanti holiday! | गांधी जयंती सुटीचे गौडबंगाल!

गांधी जयंती सुटीचे गौडबंगाल!

Next

पणजी : गोवा सरकारने महात्मा गांधी जयंतीची २ आॅक्टोबरची सुटी सरकारी सुट्यांच्या यादीतून वगळल्याच्या वृत्ताने रविवारी खळबळ माजली. वाद चिघळण्याची चिन्हे दिसताच, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या मुद्द्यावर सारवासारव करताना दिसले. हे कृत्य ‘खोडसाळपणा’ वा ‘ टंकलेखन दोष’ असू शकतो, असे ते म्हणाले.
गोवा सरकारच्या शनिवारी जाहीर केलेल्या या वर्षीच्या शासकीय सुट्यांमधून महात्मा गांधी जयंतीला वगळल्याचे वृत्त आले. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले, नेमक्या त्याच दिवशी ही घटना घडली.
काँग्रेसने गोवा सरकारच्या या कृत्याला जोरदार विरोध केला आहे. गांधी जयंतीला सार्वजनिक सुट्यांच्या यादीतून वगळणे हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे. भाजप सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचा आरोप यानिमित्ताने काँगे्रसने केला. देशभरातून याचे पडसाद उमटले; परंतु २४ तासांतच सरकारने सुटी रद्द केलेली नाही आणि तसा प्रस्तावही नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि प्रकरणावर पडदा टाकला.
सुटी रद्द करण्याचा प्रस्ताव नाहीच तसेच सरकारी कॅलेंडरमध्ये ही सुटी अधिकृतरीत्या दाखवल्याचे सरकारने स्पष्ट केले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारचा निषेध केला. महात्मा गांधीजींबद्दल अलीकडे आदर दाखवणारे भाजप नेते आपल्या मुळावर गेले, अशी टीका त्यांनी केली. स्वच्छ भारत मोहीम राबवायची आणि दुसरीकडे असा अनादर करायचा हे योग्य नव्हे. हा विषय सोमवारी राज्यसभेत मांडणार असल्याचे ते म्हणाले.
अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी ब्रिटनमध्ये गांधीजींचा पुतळा उभारल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले, की हा पुतळा बसविल्याबद्दल एकीकडे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ब्रिटिश सरकारची तोंडभरून स्तुती केली. ही ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय आदरांजली, असेही म्हटले. दुसरीकडे गोव्यात मात्र उलटेच घडते आहे. हा भाजपचा राष्ट्रवाद की सौजन्य?
(प्रतिनिधी)

Web Title: Gandhi Jayanti holiday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.