गणेश चतुर्थी फेब्रुवारीतही शक्य : विश्वजित राणो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 04:05 PM2020-08-14T16:05:41+5:302020-08-14T16:13:38+5:30
लोकांनी खूप व्यक्तीगत स्तरावर गणोशोत्सव साजरा करावा.
पणजी: आपण स्वत: आपल्या घरी गणोश चतुर्थी येत्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातही करता येईल असे सांगितले आहे. कारण कोविडमुळे सर्वानाच काळजी घ्यावी लागते. सध्या मोठ्या प्रमाणात सण साजरा करण्यासारखी स्थिती नाही असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना राणो म्हणाले, की आपले वडिल प्रतापसिंग राणो हे 81 वर्षे वयाचे आहेत. त्यामुळे आपण त्यांना घरी आता गणेश चतुर्थी केली नाही तरी चालेल, येत्यावर्षी फेब्रुवारी महिन्यातही मुहूर्त असल्याने त्यावेळी गणोशमूर्ती पुजता येईल असे सांगितले आहे. आपण लोकांना तसे करा असे सांगत नाही पण शिगमोत्सवावेळीही आपण कोविडमुळे चिंता व्यक्त केली होती व आताही तिच चिंता व्यक्त करतोय.
लोकांनी खूप व्यक्तीगत स्तरावर गणोशोत्सव साजरा करावा. सध्या मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरे करण्यासारखी स्थिती नाही. कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे व प्रत्येकाच्या घरात वयस्कर आई, वडिल असतात. त्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने स्वत:वर बंधने घालून घेणो गरजेचे आहे.
मंत्री राणो म्हणाले, की आताच गणोश पुजन करायला हवे असे काही नाही. आपण फेब्रुवारीत गणोश पुजन केले म्हणून आपण काही कमी अध्यात्मिक होत नाही, आपणही देवभक्त आहोत असे मंत्री राणो यांनी सांगितले.
कारवाईचा इशारा-
राज्यात 96 टक्के रुग्ण हे कोविडची लक्षणे न दाखविणारे रुग्ण आहेत. अनेक रुग्ण आता घरीच राहतात. त्यांना उपचारांसाठीचे किट्स आम्ही पाठवून देतो. आणखी काय करता येईल याविषयीही विचार सुरू आहे. अनेक ठिकाणी काही लोक व काही सोसायटय़ा अशा रुग्णांना त्रस करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा रुग्णांना घरी राहण्यास किंवा त्यांच्यार्पयत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पोहचण्यास जर कुणी सोसायट्या किंवा अन्य कुणी अडचणी निर्माण करत असतील तर सरकार कडक कारवाई करील, असा इशारा राणो यांनी दिला. लक्षणो नसणाऱ्या रुग्णांना स्वत:च्या घरी राहण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना वेगळी वागणूक देणे किंवा त्यांच्यापर्यत वस्तू किंवा धान्य पोहचू नये म्हणून प्रयत्न करणो ही माणुसकी नव्हे, सरकार असे प्रकार सहन करणार नाही असे राणो यांनी सांगितले.