गोव्यातील पोटनिवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:22 PM2017-07-27T15:22:34+5:302017-07-27T15:22:40+5:30
गोव्यातील पणजी आणि वाळपई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केली. 23 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पोटनिवडणूक लढवणार आहेत.
पणजी, दि. 27 - गोव्यातील पणजी आणि वाळपई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केली. 23 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पोटनिवडणूक लढवणार आहेत.
पणजी व वाळपई या विधानसभेच्या दोन्ही जागा अनुक्रमे सिद्धार्थ कुंकळ्येकर व विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या होत्या. पोटनिवडणुकीची घोषणा आज झाल्याने आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते पणजीत तर मंत्री विश्वजित राणे हे वाळपईमध्ये भाजपाचे उमेदवार असतील.
काँग्रेसचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. दोन्ही जागा जिंकल्यास गोवा विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 14 होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास 29 जुलै रोजी आरंभ होईल. 28 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.