मुंगीमुळे वाचले कचऱ्यात टाकलेले अर्भक; मिरामार येथील पर्रीकरांच्या समाधीजवळील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:53 AM2023-12-26T09:53:48+5:302023-12-26T09:54:40+5:30
१० ते १२ दिवसांचे अर्भक आढळल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वर्ष २०२३ ला जाता जाता एक कलंक घेऊनच जावे लागले आहे. अवघ्या १० ते १२ दिवसांच्या अर्भकाला कोणीतरी मिरामार किनाऱ्याजवळ असणाऱ्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या समाधी जवळ सोडून तिथून पलायन केले आहे. मुंगी चावल्यामुळे ते बाळ रडू लागले तेथून ये-जा करणाऱ्यांचे त्या अर्भकाकडे लक्ष गेल्यामुळे त्याला जीवदान मिळाले.
सध्या नाताळामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा सुरू आहे. मिरामार किनाऱ्यावरी गर्दी पाहायला मिळत आहे. पर्रीकरांच्या समाधीस्थळाच्या बाजूला झाडीत बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे लोकांचे गेले. लोकांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्या बाळाला ताब्यात घेऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन त्यावर उपचार करण्यात आले.
सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याची माहिती इस्पितळातील डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. बाळाला त्या ठिकाणी सोडल्यानंतर तासाभरात ते आढळून आल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली आहे. त्याला सोडून जाणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पर्रीकर यांच्या समाधी स्थळाला सीसीटीव्ही कॅमरे आहेत, परंतु ह्या कॅमऱ्यात टीपण्यात आलेली दृष्ये साठविली जात नाहीत. केवळ रियल टाईमवर पाहण्यापुरतेच उपयोगाचे हे कॅमरे आहेत. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यास अडचणी होत आहेत.
तिसरी घटना
या वर्षी जन्मल्यानंतर अवघ्या काही दिवसातच सोडून देण्यात आलेले हे तिसरे अर्भक असून या पूर्वी ऑक्टोबर महिन्यात आणि जानेवारी महिन्यातही असे दुर्दैवी प्रकार आढळून आले होते. या घटनेनंतर वर्ष २०१७ ते २०२३ या काळात सापडलेल्या अर्भकांची संख्या एकूण १४ झाली आहे. त्यापैकी ९ मुली आहेत. तर प्रकरणातील दोन प्रकरणांमध्ये लिंग निर्दिष्ट केलेले नाही.
सफाई कामगार महिला गेली धावून
अर्भकाला पर्रीकर यांच्या समाधीजवळ अशा ठिकाणी ठेवण्यात आले होते जिथे सहसा कुणाची त. हे बाळ जेव्हा नजरही जात नाही. परंतु हे रडायला लागले तेव्हा त्याचा आवाज ऐकून एक सफाई कर्मचारी महिला त्या ठिकाणी धावली तेव्हाच ते बाळ तिच्या नजरेस आले. बाळाला मुंगी चावली होती म्हणून ते रडत होते. तसेच सुदैवाने तिथे कुत्रे वगैरे पोहोचण्यापूर्वीच तिला मुंगी चावली म्हणून तिच्याकडे त्या महिलेचे लक्ष गेले आणि बाळ बचावले.