मडगाव अर्बनच्या लॉकरमधून गायब झालेले दागिने सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 09:07 PM2018-12-27T21:07:33+5:302018-12-27T21:10:11+5:30

जवळच्याच लॉकरात नजरचुकीने त्या वृद्धेने दुसऱ्या लॉकरमध्ये दागिने ठेवण्याची शक्यता; चार महिन्यानंतर प्रकार उघडकीस

Garnet disappeared from the locker of Margao Urban | मडगाव अर्बनच्या लॉकरमधून गायब झालेले दागिने सापडले 

मडगाव अर्बनच्या लॉकरमधून गायब झालेले दागिने सापडले 

Next
ठळक मुद्देमडगाव अर्बनच्या आके शाखेच्या लॉकरमध्ये ही घटना घडली होती सुवर्णलंकार काढण्यासाठी आलेल्या फिलोमिना डिसिल्वा या सत्तर वर्षीय महिलेने चुकून ते बाजुला खुल्या असलेल्या लॉकरमध्ये ठेवले स्वत:चे लॉकर बंद करुन ती गेली असावी असा निष्कर्ष बँकेच्या व्यवस्थापनाकडून सध्या काढण्यात आला आहे.

मडगाव - येथील मडगाव अर्बन बँकेच्या लॉकरमधून  झालेले दहा लाखांचे सुवर्णलंकार शेवटी बाजूच्या लॉकरमधून गुरुवारी हस्तगत झाले. हे सुवर्णलंकार काढण्यासाठी आलेल्या फिलोमिना डिसिल्वा या सत्तर वर्षीय महिलेने चुकून ते बाजुला खुल्या असलेल्या लॉकरमध्ये ठेवले असावेत आणि तिने विसरुन आपले स्वत:चे लॉकर बंद करुन ती गेली असावी असा निष्कर्ष बँकेच्या व्यवस्थापनाकडून सध्या काढण्यात आला आहे. मडगाव अर्बनच्या आके शाखेच्या लॉकरमध्ये ही घटना घडली होती.

या बँकेचे सरव्यवस्थापक किशोर आमोणकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, ज्या लॉकरमध्ये हे सोन्याचे दागिने मिळाले तो लॉकर कुणालाही अलोट न केल्यामुळे खुलाच ठेवण्यात आला होता. सदर लॉकर त्या महिलेच्या लॉकरच्या शेजारीच होता. त्या महिलेच्या लॉकरमधून सोने गायब झाल्याची तक्रार दिल्यानंतर बुधवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकर रुमची पहाणी केली असता, जवळच्या खुल्या लॉकरमध्ये काही तरी ठेवलेली एक पिशवी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँक व्यवस्थापकाला त्याची माहिती दिली. ही माहिती त्वरित मडगाव पोलिसांना दिल्यानंतर गुरुवारी तक्रारदार एडगर डिसिल्वा, त्याची आई फिलोमेना डिसिल्वा, मडगाव पोलीस व अन्य दोघांच्या उपस्थितीत ती पिशवी उघडण्यात आली असता त्या पिशवीत सर्व दागिने व्यवस्थीत असल्याचे दिसून आले.

मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, 14 ऑगस्टला या महिलेने आपल्या लॉकरमधून दागिने काढले होते. त्याचवेळी चुकून तिने हे दागिने जवळच्या दुसऱ्या लॉकरमध्ये ठेवले असावेत अशी शक्यता आमोणकर यांनी व्यक्त केली. जे अनअलोटेड लॉकर्स असतात त्यांना बंद करुन गंज लागू नये यासाठी ते खुलेच ठेवले जातात. हाही लॉकर त्याचप्रमाणो खुला ठेवला होता. ऑगस्टनंतर त्या लॉकरला कुणीही हात न लावल्याने सर्व दागिने व्यवस्थित मिळाले असे ते म्हणाले. हा लॉकर खुला असला तरी तो झाकलेला होता. त्यामुळेच या लॉकरकडे कुणाचे लक्ष गेले नाही. बुधवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पहाणी केली असता सदर लॉकर झाकलेला असला तरी त्याला चावी केलेली नाही हे लक्षात आल्यावर तो उघडून पाहिला असता हे सोने सापडले असे त्यांनी सांगितले. लॉकरमध्ये सोन्याच्या दोन बांगडया, नेकलेस, कर्णफुले, दोन सोनसाखळी, सोन्याचे बिस्कीट व अन्य दागिने होते.

या महिलेचा मुलगा एडगर हा विदेशात कामाला असतो. ख्रिसमसनिमित्त तो घरी आला असता, लॉकरमधील दागिने काढण्यासाठी तो मडगाव अर्बनच्या आके शाखेत गेला असता तिथे त्याला आपले काही दागिने नाहीसे झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईने त्याची वर्दी मडगाव पोलिसांना दिली होती.

 

Web Title: Garnet disappeared from the locker of Margao Urban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.