आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवून मारुन टाकले; पोलिस तपास चालू

By सूरज.नाईकपवार | Published: January 20, 2024 05:16 PM2024-01-20T17:16:20+5:302024-01-20T17:17:38+5:30

पतीनेच पत्नीचा काटा काढला.

Gaurav drowned his wife in the sea to hide his misdeeds police investigation continues | आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवून मारुन टाकले; पोलिस तपास चालू

आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरवने पत्नीला समुद्रात बुडवून मारुन टाकले; पोलिस तपास चालू

सूरज नाईकपवार,मडगाव: आपली कुकर्मे लपविण्यासाठी गौरव कटियार (२९) याने आपली पत्नी दिक्षा गंगावर (२७) हिल दक्षिण गोव्यातील  काबद राम येथील सुमद्रकिनारी नेउन नंतर तिला बुडवून तिचा कायमचा काटा काढला. संशयिताने विवाहबाहय संबध असावे व त्यातूनच हे खुनाचे नाटय घडले असावे असा पोलिसांचा कयास आहे. सदया तरी संशयिताने आपले तोंड उघडलेले नाही. त्याची सध्या पाेलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या माेबाईल फोनवरुन अधिक माहिती पोलिस गोळा करीत आहेत.दरम्यान मयतच्या कुटुंबियाशी कुंकळ्ळी पोलिसांनी संपर्क साधला असून, त्यांना खुनाची माहिती दिली आहे. हे कुटुंब गोव्यात आल्यानंतर मयतच्या मृतदेहावर शवचिकित्सा होणार आहे. सदया मृतदेह येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे.

काल शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या दरम्यान खुनाची वरील घटना घडली होती. गौरव हा मूळ उत्तर प्रदेश राज्यातील लखनै येथील आहेत. तो गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथील एक तीन तारांकीत हॉटेलात रेस्टॉरन्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. दीड वर्षापुर्वी त्याचा दिक्षा हिच्याशी विवाह झाला होता. मात्र तो तिला घेउन कधीच गोव्यात आला नव्हता, महिन्याभरापुर्वी ती गोव्यात आली होती. आपल्या पतीचा कुणाशी तरी अनैतिक संबध असावे असा तिला संशय होता. आपले बिग फुटेल याची भिती गौरवलाही होती.

शुक्रवारी त्यांनी ॲक्टिवा दुचाकी भाडयाने घेतली, त्यावर दिक्षाला बसवून तो काब द राम समुद्रकिनाऱ्यावर आला. हा किनारा खडकाळ आहे. एका खडकाच्या ठिकाणी तो तिला घेउन गेला. यावेळी किनाऱ्यावर काही पर्यटकही होते, ते सेल्फी घेत होते. काहीवेळानंतर गौरव हा एकटाच बाहेर आला, त्यावेळी त्याच्या समवेत दिक्षा नव्हती. तो सरळ चालत बाहेर येत असताना काही मिनिटातच दिक्षाचा मृतदेह समुद्राच्या पाण्यात तंरगू लागला. तेथे उपस्थितांना याबाबत शंका आली. त्यातील एकाने लागलीच पोलिसांना त्याबाबत कळविले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन संशयिताला ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. मात्र कशासाठी खुन केला याबाबत तो अधिक माहिती देत नाही. भादंसंच्या ३०२ कलमाखाली त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासिशय पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Gaurav drowned his wife in the sea to hide his misdeeds police investigation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.