दिवाळीनिमित बाजारात गावठी पोहे दाखल; ८० रुपये किलोने गोव्यात होतेय विक्री

By पूजा प्रभूगावकर | Published: November 7, 2023 01:31 PM2023-11-07T13:31:21+5:302023-11-07T13:32:00+5:30

आकाश कंदील, रंगबिरंगी पणत्या, विद्युत रौषणाई, सजावटीचे साहित्य यांनी सजली बाजारपेठ

Gavathi Pohe entered the market for Diwali; Selling at Rs 80 per kg in Goa | दिवाळीनिमित बाजारात गावठी पोहे दाखल; ८० रुपये किलोने गोव्यात होतेय विक्री

दिवाळीनिमित बाजारात गावठी पोहे दाखल; ८० रुपये किलोने गोव्यात होतेय विक्री

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी-गोवा: दिवाळी निमित बाजारात गावठी पोहे दाखल झाले असून ते ८० रुपये किलो या दराने मिळत आहेत. दिवाळीला दोन दिवस असताना या किंमतीत आणखीन वाढ शक्य आहे.

दिवाळीला अवघेच काही दिवस बाकी असून त्यानिमित बाजारपेठ सजू लागली आहे. आकाशकंदिल, रंगबिरंगी पणत्या, विद्युतरौषणाई, सजावटीचे साहित्य आदी साहित्य दाखल झाले आहे. आकाशकंदील आकारानुसार १२० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोक बाजारात गर्दी करु लागले आहेत. याशिवाय नरकासुर मुखवटेही विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

दिवाळीत वेगवेगळा फराळ तयार केला जातो. यात चकली, शेव, शंकरपाळी, अनारसे यासारख्या विविध गोड पदार्थांचा समावेश असतो. दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तयार केले जातात. यात विशेष करुन गावठी पोह्यांचा समावेश आहे. त्यापासून गोड पोहे, तिखट पोहे, ताकातले पोहे , दुधातले पोहे आदीचा समावेश आहे. खास दिवाळी काळातच गावठी पोहे बाजारात मिळतात. सध्या ते ८० रुपये किलो मिळत आहेत.

Web Title: Gavathi Pohe entered the market for Diwali; Selling at Rs 80 per kg in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.