जीसीईटी निकाल जाहीर
By admin | Published: May 12, 2015 01:57 AM2015-05-12T01:57:55+5:302015-05-12T01:58:07+5:30
पणजी : गोवा सीईटीचा निकाल जाहीर झाला असून मुष्टिफं ड आर्यन हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
पणजी : गोवा सीईटीचा निकाल जाहीर झाला असून मुष्टिफं ड आर्यन हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. फिजिक्समध्ये मुष्टिफंड आर्यनचा आनंद पी. एस. (७0 गुण), केमिस्ट्रीमध्ये राही शेट्ये (६९) गुण मिळवून प्रथम स्थानी आली. राही हिने गोवा बोर्डातही बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत पहिला क्रमांक मिळविला आहे. मॅथेमॅटिक्समध्ये रोहन सक्सेना याने पैकीच्या पैकी ७५ गुण प्राप्त केले, तर बायोलॉजीमध्ये मुष्टिफंड हायर सेकंडरीची युगा गिरीश प्रभू हिने ६७ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला.
शिक्षण सचिव पी. मॅथ्यू सॅम्युअल यांनी पर्वरी येथे तांत्रिकी शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात हा निकाल जाहीर केला. या प्रसंगी आयआयटी मुंबईचे प्रा. एस.एस. मेजर, तांत्रिकी शिक्षण संचालक विवेक कामत, उपसंचालक प्रदीप कुस्नूर, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन. शेट, सहाय्यक संचालक दीपक गायतोंडे, उल्हास सावईकर आदी उपस्थित होते.
जीसीईटी परीक्षेत सर्वाधिक ५0६६ विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री, ३४४९ विद्यार्थ्यांनी मॅथेमॅटिक्स, ३८१५ जणांनी बायोलॉजी हा विषय घेतला होता. प्रश्नपत्रिका ७५ गुणांची असते. फिजिक्समध्ये सर्वाधिक ७0, केमिस्ट्रीमध्ये ६९, मॅथेमॅटिक्समध्ये ७५ तर बायोलॉजीमध्ये ६७ गुण प्राप्त करण्यात आले.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी फिजिक्स व मॅथेमॅटिक्स हे विषय घेतात तर वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी हे विषय घेतात.
चार दिवसांत निकाल
पणजी व फोंड्यातील प्रत्येकी दोन व अन्य ९ मिळून एकूण १३ केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. सत्तरीतील विद्यार्थ्यांसाठी साखळी हायर सेकंडरी व बार्देसमधील विद्यार्थ्यांसाठी आसगाव येथील डीएमसी कुशे महाविद्यालय अशी दोन नवी केंद्रे या वेळी होती. या वर्षीही केवळ चार दिवसांतच निकाल जाहीर करण्यात आला. उत्तरपत्रिका इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ‘स्टॅण्डर्ड आॅप्टिकल स्कॅनर’वर तपासण्यात आल्याचे आयआयटीचे (मुंबई) प्राध्यापक एस.एस. मेजर यांनी सांगितले. या परीक्षा घेण्यात आयआयटी सहकार्य करते. (पान २ वर)