चिन्ह मिळवा; मगच युती!

By admin | Published: December 29, 2016 01:58 AM2016-12-29T01:58:45+5:302016-12-29T02:03:45+5:30

पणजी : गोवा सुरक्षा मंच पक्षाने अगोदर निवडणूक आयोगाकडून चिन्ह प्राप्त करावे; मगच मगो पक्ष गोवा सुरक्षा मंचसोबत

Get the icon; Then the Alliance! | चिन्ह मिळवा; मगच युती!

चिन्ह मिळवा; मगच युती!

Next

पणजी : गोवा सुरक्षा मंच पक्षाने अगोदर निवडणूक आयोगाकडून चिन्ह प्राप्त करावे; मगच मगो पक्ष गोवा सुरक्षा मंचसोबत युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेईल, असे ‘मगोप’चे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे सांगितले.
आर्चबिशप पॅलेसवर झालेल्या एका सोहळ्यानंतर आमदार ढवळीकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला. सुभाष वेलिंगकर यांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचने स्थापन केलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाशी युती होऊ शकते काय, असे विचारले असता, ढवळीकर म्हणाले की, आम्ही अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही; कारण गोवा सुरक्षा मंचला अजून चिन्हही मिळालेले नाही. मगो पक्षाकडे सिंह ही लोकप्रिय निशाणी आहे. गोवा सुरक्षा मंचला चिन्ह मिळाल्यानंतर मगच काय तो विचार करता येईल. त्यानंतरच युतीबाबत काय तो निर्णय घेता येईल. यापुढे खूप गोष्टी घडायच्या आहेत. एकदा निवडणूक आचारसंहिता लागू झाली की, बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडतील.
गोवा सुरक्षा मंचची आमच्यासोबत युती झाली नाही, तर तो पक्ष ‘मगोप’मध्ये
विलीन करण्याचाही पर्याय खुला आहे, असे संकेत ढवळीकर यांनी दिले. अपक्ष आमदारदेखील चालणार नाहीत. अपक्ष आमदारांनीदेखील दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करायला हवा, असे ढवळीकर म्हणाले. या वेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हेही उपस्थित होते. खंवटे यांना आपण
‘मगोप’मध्ये प्रवेश करा, असे म्हणत नाही;
पण त्यांनीदेखील येत्या निवडणुकीवेळी एखाद्या पक्षात प्रवेश करावा, असे आपण सुचविले असल्याचे ढवळीकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Get the icon; Then the Alliance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.