"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा"

By किशोर कुबल | Published: March 31, 2024 04:55 PM2024-03-31T16:55:58+5:302024-03-31T17:00:33+5:30

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला.

get to work; women ZPs, show leadership says Pramod sawant | "स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा"

"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा"

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी म्हापशात घेतली. स्वस्थ बसू नका, कामाला लागा. महिला झेंडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा, असे आवाहन त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केले. उमेदवार निवडून येईल म्हणून कोणी आरामात राहू नये, यावेळी जास्त मताधिक्क्य मिळायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. मुख्यमंत्री म्हणाले की,‘प्रत्येक झेडपी सरासरी २० हजार मतदारसंख्या असलेल्या जि. पं. मतदारसंघातून निवडून आलेला आहे. आमदारांपाठोपाठ झेडपींचीही लोकसभा उमेदवारासाठी काम करणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच तुम्ही स्वत: केलेली विकासकामे घेऊन लोकांपर्यंत जा. आमच्या उमेदवाराला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतें मिळायला हवीत या दृष्टिकोनातून जोमाने कामाला लागा. लोकांनी जर काही विषय मांडले, तर त्यांचे शंका निरसन करा. समस्या सोडवण्याचे प्रयत्न करा’, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ मतदारसंघ मोठा असल्याने उमेदवार सर्वत्र पोहचू शकणार नाही. त्यामुळे पुढील ४० दिवस आमदार, झेडपी व पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावतीने आपण लोकांपर्यंत पोहोचावे लागेल.’

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, कोअर कमिटीचे सदस्य दत्तप्रसाद खोलकर बैठकीला उपस्थित होते. जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर यांनी आभार मानले.

Web Title: get to work; women ZPs, show leadership says Pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.