वाठादेव-सर्वण खाण पुन्हा सुरू करण्याचा घाट
By admin | Published: May 20, 2015 01:47 AM2015-05-20T01:47:10+5:302015-05-20T01:47:19+5:30
मये : डिचोली तालुक्यातील वाठादेव-सर्वण येथील मेसर्स झांट्ये मायनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची बंद असलेली खाण पुन्हा सुरू करण्याचा घाट
मये : डिचोली तालुक्यातील वाठादेव-सर्वण येथील मेसर्स झांट्ये मायनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची बंद असलेली खाण पुन्हा सुरू करण्याचा घाट सरकारातील एक आमदार, दोन वरिष्ठ नेते यांनी घातला असून ही खाण त्रिमूर्ती कंपनीने लिजवर घेतली आहे. आता परत एकदा न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय आपणाकडे दुसरा पर्याय नाही. ही खाण आपण मुळीच सुरू करू देणार नाही, असा इशारा पर्यावरणप्रेमी रमेश गावस
यांनी पत्रकार परिषदेत दिला.
या खाणीस या भागातील नागरिकांनी त्या वेळी जोरदार विरोध केला होता. पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी दिल्ली उच्च न्यायालयात या खाणीस आव्हान दिले असता या कंपनीचा पर्यावरणीय परवाना रद्द केला होता. आता मागच्या दाराने सत्तेचा वापर करून संबंधितांनी पर्यावरणीय दाखला मिळविला आहे. ही खाण सुरू झाल्यास डिचोली नदीचे अस्तित्वच मिटणार असून वाठादेव-सर्वण गाव उद्ध्वस्त होणार आहे. (पान २ वर)