जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित

By समीर नाईक | Published: January 27, 2024 04:10 PM2024-01-27T16:10:20+5:302024-01-27T16:10:36+5:30

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते या तुकडीच्या कमांडरला  चषक प्रदान करण्यात आले.

GHRDC Women's Troop adjudged as the best unarmed marching troop | जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित

जीएचआरडिसी महिला तुकडी सर्वोत्तम निशस्त्र मार्चिंग तुकडी म्हणून घोषित

पणजी:गोवा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित राज्यस्तरीय ७५ व्या प्रजासत्ताक दिन परेड २०२४ मध्ये गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या चतुरस्त्र पोशाख असलेल्या महिला तुकडीला निशस्त्र श्रेणीतील सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी म्हणून घोषित करण्यात आले.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते या तुकडीच्या कमांडरला 
चषक प्रदान करण्यात आले.

राज्यातील सर्व सरकारी महत्वाच्या ठिकाणी सदर महिला सुरक्षा कर्मी तैनात असतात. तसेच नेहमीच लोकांची मदत करण्याची भावना ठेऊन त्या प्रामाणिकपणे सेवा बजावत असतात. त्यांनी दाखवलेल्या क्षमता, हिम्मत, शिस्त आणि आत्मविश्वास या गुणांमुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.

 गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रुडॉल्फ फर्नांडिस आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मनेरकर यांनी देखील या महिला दलाच्या कामगिरीचे कौतुक केले, तसेच त्यांची भेट घेत त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: GHRDC Women's Troop adjudged as the best unarmed marching troop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा