उत्तरेत गिरीश चोडणकर, दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:37 PM2019-03-25T22:37:07+5:302019-03-25T22:37:10+5:30

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर 

Girish Chodankar in the north, Francis Sardin in the south goa congress contestent | उत्तरेत गिरीश चोडणकर, दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन

उत्तरेत गिरीश चोडणकर, दक्षिणेत फ्रान्सिस सार्दिन

Next

पणजी : कॉँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले असून उत्तर गोव्यात गिरीश चोडणकर तर दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिले आहे.

गिरीश हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असून २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पणजी मतदारसंघात दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांना उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्याशी सामना करावा लागेल. 

फ्रान्सिस सार्दिन (७२) हे माजी खासदार आहेत,याआधी ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याजागी रेजिनाल्द लॉरेन्स यांना तिकीट देण्यात आली आणि रेजिनाल्द यांचा पराभव झाला. 

सार्दिन हे १९९९ साली काँग्रेस पक्ष त्यांनी फोडला आणि गोवा पीपल्स काँग्रेस स्थापन करुन भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. १४ व्या लोकसभेवर पोटनिवडणुकीत ते विजयी ठरले तसेच १५ व्या लोकसभेवरही दक्षिण गोव्यातून निवडून आले. 

Web Title: Girish Chodankar in the north, Francis Sardin in the south goa congress contestent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.