मुंबईतून घरातून पळालेली मुलगी गोव्यात सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 08:16 PM2018-09-30T20:16:52+5:302018-09-30T20:17:16+5:30

कफपरेड पोलीस ठाण्याचे पोलीस गोव्यात दाखल

A girl escaped from Mumbai was found in Goa | मुंबईतून घरातून पळालेली मुलगी गोव्यात सापडली

मुंबईतून घरातून पळालेली मुलगी गोव्यात सापडली

Next

मडगाव: मुंबईच्या कुलाब परिसरातून घरातून पळून आलेली एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी शनिवारी सायंकाळी गोव्यात सापडली. दक्षिण गोव्यातील मडगावहून बारा किलो मीटर अंतरावरील सां जुङो दि अरियाल या भागात ती सापडली. येथील स्थानिक पंच अॅलस्टिर फर्नाडीस यांनी सतर्कता दाखवित त्या मुलीबद्दल गोव्यातील मायणा - कुडतरी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले. रविवारी सांयकाळी मुंबईतील कफपरेड पोलीस ठाण्यातील पोलीसांचे एक पथक गोव्यातील मडगाव येथे पोहचले. अल्पवयीन मुलीला त्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


सदर मुलगी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती नववी इयत्तेत शिकत आहे. कुटुंबियांचे कपडयांचे दुकान आहे. घरातील मंडळी त्रास देत असल्याने आपण घरातून पळून गेल्याची ती मुलगी पोलिसांना सांगत आहे. शुक्रवारी ती घरातून पळाली होती. नंतर मुंबई येथून रेल्वेमार्गे ती शनिवारी मडगाव येथे पोहचली. मडगावच्या स्थानकावर उतरल्यानंतर ती पायी चालत सां जुङो दि अरियाल येथील नायकाभाट या गावात गेली. तेथे तिने एका घरात काम आहे का अशी विचारणा केली. सुदैवाने हे घर स्थानिक पंच अॅलिस्टर फर्नाडीस यांचे होते. त्या मुलीचा चेहरा बघितला असता ती अल्पवयीन असावी, अशी फर्नांडीस यांना शंका आल्यानंतर त्यांनी त्वरीत पोलिसांना कळविले. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवणीकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमरनाथ पार्सी यांनी नंतर घटनास्थळी जाउन त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतले.


तिच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रच्या आधारे कुटुंबियाकडे संपर्क साधण्यात आला असता  ती घरातून बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्या मुलीच्या पालकांनी यासंबंधी कफपरेड पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. तेथील पोलिसांनी अपहरण म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले होते. मायणा - कुडतरी  पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतल्यानंतर तिला नुवे येथील बेलॉय सिस्टिर शेल्टरमध्ये ठेवले आहे.

Web Title: A girl escaped from Mumbai was found in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.