गोव्यातील जगप्रसिद्ध मिरामार किनाऱ्यावर काचांचे तुकडे, सोशल मीडियावरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 12:08 PM2017-12-25T12:08:53+5:302017-12-25T12:09:11+5:30

उत्तर गोव्यातील मिरामार हा जगातील प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे. राजधानी पणजीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरामार किनाऱ्यावर अलिकडे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा मोठ्या संख्येने सापडू लागल्याने या किनाऱ्यावर मॉर्निग वॉकसाठी जाणारे गोमंतकीय हैराण आहेतच. शिवाय पर्यटकांनाही त्यामुळे त्रास होतो आहे.

Glass pieces on the world-famous Miramar beach Goa, criticism from Goa | गोव्यातील जगप्रसिद्ध मिरामार किनाऱ्यावर काचांचे तुकडे, सोशल मीडियावरून टीका

गोव्यातील जगप्रसिद्ध मिरामार किनाऱ्यावर काचांचे तुकडे, सोशल मीडियावरून टीका

Next

पणजी - उत्तर गोव्यातील मिरामार हा जगातील प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे. राजधानी पणजीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरामार किनाऱ्यावर अलिकडे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा मोठ्या संख्येने सापडू लागल्याने या किनाऱ्यावर मॉर्निग वॉकसाठी जाणारे गोमंतकीय हैराण आहेतच. शिवाय पर्यटकांनाही त्यामुळे त्रास होतो आहे.

मिरामार किनाऱ्यावर कोणत्याही दिवशी शेकडो पर्यटक आणि स्थानिक लोक फिरत असतात. मुलांना खेळण्यासाठीही तिथे सुविधा आहेत. त्यामुळे सहकुटूंब मिरामार किनाऱ्यावर शनिवार व रविवारी हजारो पर्यटक आणि स्थानिक गोमंतकीय आलेले असतात. सकाळी अनेक महिला व पुरुष मिरामार किना:यावर मॉनिंग वॉकसाठी जातात. सायंकाळी पायात चपला किंवा बूट न घालता पर्यटक या किनाऱ्यावरील मऊशार रुपेरी वाळूवरून फिरण्याचा आनंद लुटू पाहतात. मात्र अलिकडे मोठ्या संख्येने काचा सापडू लागल्याने सोशल मीडियावरून स्थानिकांनी याविरुद्ध टीका चालवली आहे. पर्यटन खाते किनारपट्टी स्वच्छतेवर दरवर्षी काही कोटी रुपये खर्च करते. खात्याच्या यंत्रणेने किनाऱ्यावरील काचा पहाव्यात व त्याविरुद्ध उपाययोजना करावी, अशी मागणी काही नेटीझन्स करू लागले आहेत. पहाटे मॉर्निग वॉकला जाणाऱ्या कांपाल, मिरामार, दोनापावल अशा भागातील लोकांनी या किनाऱ्यावरील थोड्या काचा गोळा करून त्याचे छायाचित्रही फेसबुकवर टाकले आहे. किना:यावर पायाला काचा टोचू लागल्याने पर्यटकांमध्येही तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 
मिरामार किनाऱ्यावरून सुर्यास्ताचे अत्यंत विहंगम असे दृश्य दिसते. पलिकडे आश्वाद तसेच रेईशमागूशचे किल्ले आहेत. आग्वादला असलेल्या दिपस्तंभाचे नेत्रदिपक दृश्य मिरामार किनाऱ्यावर रात्री पहायला मिळते. अनेक स्थानिक रात्रीच्यावेळीही या किनाऱ्यावर फिरतात. त्यांच्यासाठी या काचांमुळे धोका संभवतो. मिरामार किना:यालाच टेकून गोवा पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये राहणारे देश- विदेशातील पर्यटकही मोकळ्या पायांनी विसाव्यासाठी रात्रीच्यावेळी या किनाऱ्यावर येतात. त्यांनाही काचा टोचू शकतात. 

दक्षिण गोव्यातील काही किनाऱ्यांवर अलिकडे मोकाट गुरे फिरत असल्याचे फोटो काहीजणांनी सोशल मिडियावर टाकले होते. तसेच बागा वगैरे किना:यांवरील कचऱ्याचे साम्राज्य दाखविणारे फोटोही काहीजणांनी टाकले होते. त्यानंतर आता मिरामार किनाऱ्यावरील काचांचे तुकडे दाखविणारे फोटो फेसबुकवरूनही लोकांनी शेअर केले आहेत. त्याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. नवे वर्ष साजरे करण्यासाठी लाखो पर्यटक मिरामार किनाऱ्यावर दि. 30 व 31 रोजी तसेच दि. 1 जानेवारीलाही असतील. काहीवेळा पर्यटक देखील किना:यांवरच बिअर, मद्य वगैरे पितात आणि मग बाटल्या तिथेच टाकतात. किना:यावर दहा- बारा कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत पण त्यातही बाटल्या टाकल्या जात नाहीत. काहीजण बाटल्या तिथेच फोडतात. याविरुद्ध उपाययोजना होण्याची गरज व्यक्त होत आहे.
 

Web Title: Glass pieces on the world-famous Miramar beach Goa, criticism from Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा