गोवा : वीज खात्यात १ हजार २६१ पदे रिक्त : सर्वाधिक जास्त लाईन हेल्पर ४९५ पदे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 03:55 PM2024-02-10T15:55:42+5:302024-02-10T15:55:58+5:30
वीज खात्यात सर्वाधिक जास्त सरकारी रिक्त पदे असून एकूण १ हजार २६१ पदे रिक्त आहेत.
नारायण गावस
पणजी: वीज खात्यात सर्वाधिक जास्त सरकारी रिक्त पदे असून एकूण १ हजार २६१ पदे रिक्त आहेत. २०२२ पासून ही पदे रिक्त असू अजूनही या पदांसाठी जाहीरात आलेली नाही अशी माहती अधिवेशनात वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लेखी स्वरुपात दिली. आमदार वेंझी व्हिऐगास यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता.
वीज खात्यामध्ये मुख्य अभियंत्याच्या पदापासून कनिष्ट अभियंते सहायक अभियंते लाईनमॅन, वायरमॅन, ड्राईव्हर एलडीसी, प्युऊन व अन्य विविध पदांची गरज आहेत. पण अजू्न वीज खात्याने ही पदे भरलेली नाही. २०२२ पासून या पदांसाठी जाहीरात आलेली नाही. आता या पदांसाठी जाहीरात आली तर ही पदे कर्मचारी भरती आयाेगामार्फत भरली जाऊ शकतात. वीज खात्याकडून ही रिक्त पदे लवकर भरली जाणार असून त्यासाठी लवकरच जाहिरात येणार असल्याचेही या लेखी उत्तरात म्हटले आहे.
अनेक खात्यांमध्ये रिक्त पदे
सरकारच्या वीज खात्याप्रमाणे अन्य विविध खात्यामध्ये रिक्त पदे आहेत. पण बहुतांश पदे ही कंत्रटी तत्वावर किंवा तात्पुरती पदावर भरली जात आहे. तर काही काही खात्यांमध्ये साेसायटीमार्फत कामगारांना घेतले जात आहे. सार्वजनिक बांधकाम खाते वीज खाते पाेलीस खाते या खात्यामध्ये सर्वाधिक जास्त सरकार कर्मचाऱ्यांची गरज असते.
सर्वाधिक जास्त रिक्त पदे
पदांचे नाव : संख्या
लाईन हेल्पर :४९५
सहायक लाईन मॅन वायरमॅन : १११
ड्राईव्हर : १२७
कनिष्ठ अभियंता : ६१
सहाय्यक अभियंता :३८
एलडीसी : ३४
मीटर रीडर : २४
प्युऊन: ३७