coronaVirus News: गोव्यात ६० दिवसांत ७० वर्षांवरील १०० रुग्णांचा कोविडने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:43 PM2020-12-02T12:43:18+5:302020-12-02T12:43:26+5:30
पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे. ७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे. मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण ...
पणजी : गेल्या साठ दिवसांमध्ये ७० वर्षे व त्याहून जास्त वयाच्या एकूण १०० रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आरोग्य खात्याकडे नोंद असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास दि. १ ओक्टोबरपासून १०० दिवसांत ७०, ७५, ८० व ९० वर्षांच्या मिळून १०० व्यक्तींचा जीव गेला हे स्पष्ट होत आहे.
७० वर्षे झालेल्या तसेच वयाची पंचाहत्तरी, एैंशी पार केलेल्या नागरिकांनी कोविड काळात अधिक काळजी घ्यायला हवी हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट होते. कारण जे एकूण सुमारे तीनशे नागरिक गेल्या दोन महिन्यांत मरण पावले, त्यात १०० नागरिक हे ७० ते ८५ या वयोगटातील आहेत. ९० वर्षांचे दोन रुग्ण मरण पावले. ७२ व ७५ वर्षांचे अनेक नागरिक मरण पावले. अनेक वर्षे डायबेटीस किंवा उच्च रक्तदाब असलेल्या ७५ व ८० वर्षे वयाच्या रुग्णांचा कोविडने जीव घेतला आहे.
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंंबरमध्ये अशा नागरिकांच्या बळींची संख्या कमी आहे. मात्र सप्टेंबर व ऑगस्ट महिन्यात अशा प्रकारच्या रुग्णांचा जास्त संख्येने बळी गेला आहे.
मृत्यू प्रमाण सातशेच्या दिशेने
दरम्यान,आतापर्यंत राज्यात ६९० हून अधिक व्यक्तींचे कोविडने बळी घेतले. २२ जून रोजी गोव्यात कोविडचा पहिला बळी नोंद झाला होता. त्यावेळपासून आतापर्यंतचे बळींचेप्रमाण पाहिले तर सातशेचा आकडा गाठण्याच्यादिशेने स्थिती जात आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र याचबरोबर हेही खरे की, गेल्या सहा महिन्यांत एकूण ४६ हजारपेक्षा जास्त कोविड रुग्ण आजारातून ठीक झाले.
हजारो ज्येष्ठ नागरिकांनीही कोविडवर यशस्वी मात केली आहे. एकूण ४८ हजार २०० हून जास्त व्यक्तींना गोव्यात कोविडची बाधा झाली. रोज सरासरी दीडशे रुग्ण कोविडवर मात करत आहेत. ९५.७३ टक्के असे आजारातून बरे होण्याचे प्रमाण आहे.