Goa: १२४ व्या वास्को दामोदर भजनी सप्ताहाची सांगता

By पंकज शेट्ये | Published: August 23, 2023 05:00 PM2023-08-23T17:00:45+5:302023-08-23T17:00:57+5:30

Goa: समुद्रात श्रीफळाचे विर्सजन केल्यानंतर ‘गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला’ च्या जयघोषात बाळ गोपाळ मंदिरात पोचल्यानंतर सप्ताहाची सांगता झाली

Goa: 124th Vasco Damodar Bhajani Week concludes | Goa: १२४ व्या वास्को दामोदर भजनी सप्ताहाची सांगता

Goa: १२४ व्या वास्को दामोदर भजनी सप्ताहाची सांगता

googlenewsNext

- पंकज शेट्ये
वास्को - मंगळवारी वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सुरू झालेला अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाची बुधवारी (दि.२३) दुपारी खारीवाडा समुद्रात उत्सव समितीच्या श्रीफळाचे विर्सजन करून बाळ गोपाळ मंडळी मंदिरात पोचल्यानंतर आरती, गाºहायणे घालून सांगता झाली. ‘गोपाळ काला गोड झाला... गोपाळाने गोड केला...आमचा विठोबा घराशी आला’ च्या जय घोषात मंडळी मंदिरात पोचल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत १२४ व्या दामोदर भजनी सप्ताहाची दुरापी २.३० वाजता सांगता झाली.

मंगळवारी (दि.२२) दुपारी उद्योजक प्रशांत जोशी यांच्याहस्ते देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यानंतर १२४ व्या भजनी सप्ताहाची सुरवात झाली होती. सप्ताहाची सुरवात झाल्यानंतर मंगळवार दुपारपासून बुधवारी दुपारपर्यंत वास्कोतील वेगवेगळ््या भजनी पथकांनी २४ तास सतत मंदिरात भजन सादर केले. तसेच मंगळवारी संध्याकाळी परंपरेनुसार वेगवेगळ््या समाजाचे पार  - दिंडी मृदंगाच्या तालावर येण्यास सुरू झाल्यानंतर बुधवारी पहाटेपर्यंत वेगवेगळे पार मंदिराच्या आवारात येत असल्याचे दिसून आले. मंगळवारी रात्री मंदिराच्या बाहेरील दोन्ही बाजूने अफाट गर्दीकरून लोक रांगेत उभे राहून देव दामोदराचे दर्शन घेण्यासाठी आत जात असल्याचे दिसून आले. वास्कोचे ग्राम दैवत देव दामोदराच्या सप्ताहाच्या निमित्ताने दोन दिवसात वास्कोतील भाविकाबरोबरच गोव्यातील वेगवेगळ््या भागातून आणि शेजारच्या राज्यातील हजारो भक्तगणांनी मंदिरात येऊन ‘श्रीं’ चा आर्शिवाद घेतला. वास्कोच्या विविध ठिकाणी उभारलेल्या व्यसपिठावर वेगवेगळ््या समाजाने बोलवलेल्या गायकांच्या मैफल ऐकण्यासाठी मंगळवारी उशिरा रात्रीपर्यंत भक्तांनी अफाट गर्दि केल्याचे दिसून आले.

बुधवारी सकाळी देव दामोदर मंदिरातून उत्सव समितीचा श्रीफळ घेऊन बाळ गोपाळ मंडळी ताळ - मृदंगाच्या तालावर दिंडीने निघाल्यानंतर खारीवाडा समुद्र किनाºयावर जाऊन पोचली. श्रीफळ विर्सजनासाठी निघालेल्या दिंडीत मोठ्या प्रमाणात युवा - तरुण तसेच ज्येष्ठ भक्तगणांची उपस्थिती होती. खारीवाडा समुद्रात परंपरेनुसार दामोदर नार्वेकर यांनी श्रीफळाचे विर्सजन केल्यानंतर बाळ गोपाळ मंडळी ‘गोपाळ काला गोड झाला....गोपाळाने गोड केला....आमचा विठोबा घराशी आला‘ च्या जय घोेषात मंदिराच्या आवारात पोचली. मंडळी मंदिरात पोचल्यानंतर गोपाळ काला.... चा जयघोष आरती व पुरोहीतांच्या हस्ते समस्थ भक्तांच्या हीतासाठी गा-हायणे घातल्यानंतर अखंड अशा १२४ व्या २४ तासाच्या सप्ताहाची सांगता झाली. बुधवारी दुपारी सप्ताहाची सांगता झाली तरी मोठ्या संख्येने भक्तगण ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी मंदिरात येत असल्याचे दिसून आले. दामोदर भजनी सप्ताहाची सांगता बुधवारी झाली तरी सप्ताहाच्या निमित्ताने वास्कोत थाटलेली फेरी पुढच्या पाच दिवसासाठी असणार आहे. वास्कोत थाटलेल्या फेरीत पुढचे पाच दिवससुद्धा भक्तगण देवाच्या दर्शनासाठी आणि फेरीत फिरण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावणार आहेत.
 

Web Title: Goa: 124th Vasco Damodar Bhajani Week concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा