गोवा : खोर्ली औद्योगिक क्षेत्रातील फॅक्टरीला मध्यरात्री आग

By समीर नाईक | Published: April 9, 2024 04:35 PM2024-04-09T16:35:51+5:302024-04-09T16:37:21+5:30

ग लागली तेव्हा फॅक्टरीत कुणीच उपस्थित नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Goa: A factory in Khorli industrial area caught fire in the middle of the night | गोवा : खोर्ली औद्योगिक क्षेत्रातील फॅक्टरीला मध्यरात्री आग

गोवा : खोर्ली औद्योगिक क्षेत्रातील फॅक्टरीला मध्यरात्री आग

पणजी : खोर्ली येथे गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिनेझिस कामको फूड प्रा. लि. कंपनीच्या फॅक्टरीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याने प्रचंड नुकसान झाले. आग लागली तेव्हा फॅक्टरीत कुणीच उपस्थित नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मिनेझिस कामको फूड प्रा. लि. कंपनीच्या फॅक्टरीला आग लागल्याचा फोन सोमवारी मध्यरात्री सुमारे २.४४ वाजता आला. फोन येताच आम्ही घटनास्थळी पोहचलो, व आग नियंत्रणात आणली. आग खूप मोठी असल्याने मंगळवारी सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्यास यश मिळाले, दुपारपर्यंत आम्ही घटनास्थळीच होतो, अशी माहिती जूने गोवा अग्निशमन दलातर्फे देण्यात आली.
 
आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कळालेले नाही, तसेच या आगीत या कंपनीचे किती नुकसान झाले याबाबतही योग्य माहिती नाही, पण निश्चितच मोठे नुकसान झाले असून, या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच संपूर्ण माहिती देता येईल, असेही अग्निशमन दलातर्फे सांगण्यात येत आहे.

Web Title: Goa: A factory in Khorli industrial area caught fire in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा