पर्यटनात गोवा एक पाऊल पुढे; चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी राज्याला पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:18 PM2023-12-11T15:18:35+5:302023-12-11T15:19:31+5:30

सर्वोत्तम 'बीच डेस्टिनेशन'चे आउटलुक ट्रॅव्हलर अवॉर्डस पटकावले आहेत.

goa a step ahead in tourism state Award for Breathtaking travel morji coast | पर्यटनात गोवा एक पाऊल पुढे; चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी राज्याला पुरस्कार

पर्यटनात गोवा एक पाऊल पुढे; चित्तथरारक प्रवास, मोरजी किनाऱ्यासाठी राज्याला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पर्यटन क्षेत्रात चमकणाऱ्या गोवा राज्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत चित्तथरारक प्रवासासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराज्य 'रोड ट्रीप रूट्स', तसेच सर्वोत्तम 'बीच डेस्टिनेशन'चे आउटलुक ट्रॅव्हलर अवॉर्डस पटकावले आहेत.

शेजारी महाराष्ट्रातील आंबोली घाट (सिंधुदुर्ग) ते गोवा या चित्तथरारक प्रवासासाठी गोव्याला सर्वोत्कृष्ट आंतरराज्य 'रोड ट्रिप रूट्स'चा पुरस्कार मिळाला आहे, तर प्रसिद्ध मोरजी किनाऱ्याने देशातील सर्वोत्तम 'बीच डेस्टिनेशन'चा पुरस्कार पटकावला आहे.

या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन खाते अभिनंदन करताना गोवा पर्यटनात चमकतच राहील, असे म्हटले आहे. पर्यटनाशी संबंधित सर्व घटकांच्या प्रयत्नांनी हे यश मळाले आहे, असे नमूद करुन त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझमच्या प्रकल्प व्यवस्थापिक नबिहा तस्नीम यांच्या नेतृत्वाखाली 'गोवा बियॉन्ड बीचेस' या विषयावरील चर्चासत्राच्या वेळी एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पुरस्कार स्वीकारला. खंवटे यांनी गोव्यात किनाऱ्याव्यतिरिक्तही अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत, असे नमूद करून पर्यटनाच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली. गोवा समृद्ध संस्कृती आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा खजिना आहे.

पर्यटनमंत्र्यांनी गोव्यातील गावांचे सौंदर्य शोधण्याच्या महत्त्वावर भर दिला, तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. खंवटे म्हणाले की, हे पुरस्कार भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून आपले स्थान मजबूत करण्यासाठी गोव्याची कटिबद्धता दर्शवितो. क्षेत्रातील दरम्यान, गोव्याने याच कामगिरीसाठी मागील आठवड्यात आणखी एक पुरस्कार पटकावला होता. यामुळे प्रेक्षणीय स्थळांकडे येणाऱ्यांचे प्रमाण आणखील वाढण्याची अपेक्षा आहे.

 

Web Title: goa a step ahead in tourism state Award for Breathtaking travel morji coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.