Goa: गोव्यात सहकाऱ्याचा खून प्रकरणी आरोप दोषीला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By सूरज.नाईकपवार | Published: May 27, 2024 08:47 PM2024-05-27T20:47:03+5:302024-05-27T20:47:22+5:30

Goa News: आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही फर्माविला.

Goa: Accused in Goa colleague's murder case sentenced to five years hard labour | Goa: गोव्यात सहकाऱ्याचा खून प्रकरणी आरोप दोषीला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

Goa: गोव्यात सहकाऱ्याचा खून प्रकरणी आरोप दोषीला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

- सूरज नाईकपवार
मडगाव -आपलाच सहकारी सुफल शर्मा (२९) याचा खून केल्या प्रकरणात दोषी ठरलेला आरोपी शुभंकर जना याला न्यायालयान पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्याला न्यायालयाने भादंसच्या ३०४ कलमाखाली दोषी ठरविताना वरील शिक्षा सुनावली तसेच ५० हजारांचा दंडही फर्माविला. गोव्यातील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयाने वरील निवाडा दिला. ११ जून २०२१ साली माजोर्डा येथे खुनाची वरील घटना घडली होती. आरोपी व मयत हे दोघेही मूळ पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. खुनाची ही घटना माजोर्डा रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. ते दाेघेही सुतार होते व पी. डिसोझा यांच्या फर्निचर दुकानात कामाला होता.

दारुच्या नशेत दोघामध्ये खटके उडून त्याची परिणती भांडणात झाली होती. शुभंकरनें सुफलवर लाकडी दंडुक्याने वार केला होता नंतर चाकूने हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. ही घटना कोलवा पोलिसांना कळाल्यानंतर जखमी अवस्थेत सुफलला येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केले होते. मात्र मागाहून त्याला मरण आले होते.
कोलवा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी या प्रकरणाचा तपास करताना शुभंकरला अटक केली होती.

न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठाविताना दंडाची रक्कम मयताचा भाउ गोपाल याला देण्यास सांगितली आहे. दंंड न भरल्यास त्याला एका वर्षाची साधी कैदही भोगावी लागेल. आरोपी सदया कोलावळ तुरुंगात असून, त्याने आतापर्यंत कोठडीत घालविलेल्या काळ शिक्षेतून वजा करण्यात येणार आहे.

Web Title: Goa: Accused in Goa colleague's murder case sentenced to five years hard labour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.