उद्यापासून दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेऊन उतरणार १५ विमाने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 09:58 PM2020-05-24T21:58:52+5:302020-05-24T22:00:30+5:30

मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैद्राबाद व म्हैसूरहून प्रवाशांना घेऊन येणार विमाने; दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांची माहिती

Goa Airport all set to resume operations 15 flights expected on 25th may | उद्यापासून दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेऊन उतरणार १५ विमाने

उद्यापासून दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेऊन उतरणार १५ विमाने

googlenewsNext

वास्को: २५ मे पासून काही प्रमाणात देशातील राष्ट्रीय प्रवासी विमानसेवा सुरू होत असून गोव्यातील दाबोळी विमानतळसुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रीय प्रवासी विमाने हाताळण्यास सज्ज झाले आहे. २५ मे पासून दाबोळी विमानतळावर देशातील विविध भागातून १५ विमाने प्रवाशांना घेऊन येणार असून याच विमानातून नंतर प्रवाशांना देशातील विविध भागात पाठवण्यात येणार आहे. दाबोळी विमानतळावर विमानसेवा हाताळताना प्रवाशांना तसेच विमानतळावरील कर्मचाºयांना व इतरांना कोरोना विषाणूचा धोका निर्माण न व्हावा यासाठी कडक रित्या विविध प्रकारची पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर भारतात राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आली होती. दाबोळी विमानतळावरील प्रवासी विमानसेवा रद्द करण्यात आली होती, मात्र गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी दाबोळी विमानतळावर मागच्या काळात ३८ खास विमाने हाताळून सात हजाराहून जास्त विविध राष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले आहे. तसेच जहाजावर खलाशी म्हणून काम करणारे इटली राष्ट्रात अडकलेल्या गोमंतकीय बांधवांना गोव्यात आणण्यासाठी दाबोळी विमानतळावर नुकतीच ३ खास विमाने हाताळण्यात आलेली आहेत. २५ मे पासून पुन्हा एकदा दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय विमानसेवा हाताळण्यास सुरवात होणार असून कोरोना विषाणूचा धोका दूर करून विमाने हाताळण्यास दाबोळी विमानतळावरील सर्व अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले असल्याचे संचालक गगन मलिक यांनी सांगितले. २५ मे पासून दाबोळी विमानतळावर सुरवातीच्या काळात १५ विमाने देशातील विविध भागातून प्रवाशांना घेऊन येणार असून याच विमानातून नंतर दाबोळी विमानतळावरील प्रवाशांना देशातील विविध भागात पाठवण्यात येणार आहे. २५ मे पासून सुरवातीच्या काळात दाबोळी विमानतळावर बेंगलुरू, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व म्हैसूर अशा भागातून विमाने प्रवाशांना घेऊन येणार असून नंतर दाबोळी विमानतळावरून सदर विमाने दुसऱ्या प्रवाशांना घेऊन जाणार असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली. यापैकी ५ विमाने एअर एशिया, २ विमाने विस्तारा, १ विमान एअर इंडीया, २ विमान गो एअर व ६ विमाने इंडीगो कंपनी हाताळणार असल्याची माहीती गगन मलिक यांनी दिली.

२५ मे पासून राष्ट्रीय विमानसेवा सुरू होत असून प्रवाशांना हाताळताना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कडक रित्या पावले उचलण्यात येणार असल्याचे गगन मलिक यांनी सांगितले. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी शारीरिक अंतर ठेवण्याकरिता विविध प्रकारची पावले उचलण्यात येणार असून यासाठी ‘वेब चेकींग’, बोर्डिंग पास मोबाईलवर डाऊनलोड करणे अशा विविध प्रकारची पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच जो प्रवासी विमानातून प्रवास करणार त्याच्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतू’ एप असणे बंधनकारक असणार असल्याची माहीती मलिक यांनी पुढे दिली. याबरोबरच प्रत्येक प्रवाशाकडून त्याला घरात क्वॉरंन्टाईन केला नव्हता, त्याला कोरोना विषाणूची बाधा झाली नव्हती अशा विविध प्रकारची माहीती घेण्यात येणार असून जर त्यांने याबाबतची माहीती चुकीची दिल्याचे समजल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आल्याची माहीती संचालक मलिक यांनी दिली. विमानतळावर येण्यापासून पूर्ण विमान प्रवास होईपर्यंत प्रवाशाने तोंडावर मास्क घालणे बंधनकारक असणार असल्याची माहीती मलिक यांनी दिली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रवाशांकडून आणण्यात येणाऱ्या सामानावर ‘सोडियम हाड्रोक्लोराईड’चा फवारा मारण्यात येणार असून प्रवाशांची पादत्रणे स्वच्छ करण्यासाठी ‘सोडियम हाड्रोक्लोराईड’ उपलब्ध करण्यात येणार आहे. एका प्रवाशाला फक्त एकच हँड बॅगेज आणण्याची मुभा असल्याची माहिती मलिक यांनी पुढे दिली. ‘एक्स रे’ मशिनातून जाताना प्रवाशांच्या अंगावर असलेले दागिने व इतर धातूच्या सामग्री पूर्वी काढून ठेवाव्या लागणार असल्याची माहीती मलिक यांनी दिली. प्रवाशाला स्पर्श करून तपासणी करण्याचा प्रसंग यामुळे येणार नसल्याची माहीती मलिक यांनी दिली. एका वेळी १५ ते २० प्रवाशांनाच शारीरिक अंतर बाळगून व इतर पावले उचलून विमानात बसवण्यात येणार असून त्यांची विमानात बसवण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रवाशांना हाताळण्यात येणार आहेत. दाबोळी विमानतळावर २५ मे पासून राष्ट्रीय विमानसेवा हाताळण्यास सुरुवात केल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या हीतासाठी सर्व उचित पावले उचलण्यात येणार असल्याचे दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी शेवटी सांगितले.

तेव्हा आणि आता
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी दररोज नव्वद विमानांची दाबोळी विमानतळावर ये - जा होत असे. त्यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विमानांचा सहभाग होता. आता ही संख्या पंधरावर आली
 

Web Title: Goa Airport all set to resume operations 15 flights expected on 25th may

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.