Goa: दिव्यांग सक्षमीकरण खात्यात सर्व सुविधा उपलब्ध, मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:15 PM2024-03-02T15:15:58+5:302024-03-02T15:17:15+5:30
Goa News: राज्यात दिव्यांग सक्षमीकरण खात्याची सुरवात एप्रिलपासून हाेणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या खात्यामार्फत आता दिव्यांगांना सर्व सुविद्या उपलब्ध असणार आहे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
- नारायण गावस
पणजी - राज्यात दिव्यांग सक्षमीकरण खात्याची सुरवात एप्रिलपासून हाेणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या खात्यामार्फत आता दिव्यांगांना सर्व सुविद्या उपलब्ध असणार आहे, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरु केलेल्या प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्रामार्फत त्यांचे हस्ते दिव्यांगांना विविध उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत सांताक्रुझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस राज्य दिव्यांग आयाेगाचे आयुक्त गुरुप्रसाद पाऊसकर, समाज कल्याण खात्याचे संंचालक अजित पंचवाडकर डॉ. शुभम पवार व इतर सदस्य उपस्थित होते.
मंत्री फळदेसाई म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने हे दिव्यांग खाते तयार झाले आहे. राज्यातील दिव्यांगाच्या समस्या आता सोडविण्यात आणखी साेपे हाेणार आहे. आम्ही राज्यातील दिव्यांगासाठी विविध योजना राबवित आहोत. प्रधानमंत्री िदिव्यांग केंद्र हे त्यासाठी खुले केले आहे. आता दिव्यांगना आपल्या उपकरणासाठी वाट पाहावी लागणार नाही. या केंद्रात नाेंदणी केल्यावर त्यांना त्याची उपकरणे मिळतात.
महिन्याभरात या केंद्रामार्फत एकूण २९ लाखांची ३१२ विविध उपकरणे दिव्यांगाना दिली आहे. याता व्हीलचेयर, कानांची उपकरणे अशा अन्य विविध उपकरणांचा समावेश आहे. प्रती दिन या केंद्रात १५ जणांची नाेंदणी हाेत आहेत, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, पर्पल फेस्ट २०२४ मार्फत अनेक दिव्यांगांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. या महोत्सवाला एक लाख लोकांनी आपली उपस्थिती लावली. दिव्यांगाना सर्व योजनांचा लाभ मिळावा त्यांना त्यांचा अधिकार मिळावे समाजात त्यांना योग्य स्थान मिळावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. राज्यात एकही दिव्यांग सुविधापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. या केंद्रामध्ये आता दिव्यांगना लाखो रुपयांची उपकरणे सहज मिळत आहेत. आता दिव्यांगसाठी प्रत्येक केद्रांवर वाहनाच सोयही केली जाणार आहे.