Goa Assembly Election 2022: निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:52 AM2022-02-16T10:52:58+5:302022-02-16T10:53:47+5:30

काँग्रेसमध्ये मायकल लोबो हेही मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार आहेत पण शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे लोबो यांचे म्हणणे आहे.

Goa Assembly Election 2022: Vishwajit Rane's fielding for the post of Chief Minister in Goa before the election results | Goa Assembly Election 2022: निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग

Goa Assembly Election 2022: निवडणूक निकालापूर्वी गोव्यात मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे यांची फिल्डिंग

Next

सदगुरू पाटील

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले पण मतमोजणी होण्यास अजून २५ दिवसांचा कालावधी असताना कालपासूनच सत्तेसाठी दोन प्रमुख पक्षांचे लॉबिंग सुरू झाले. मुख्यमंत्रीपदासाठीही खेळी सुरू झाल्या आहेत. भाजपचे एक मंत्री तथा प्रबळ नेते विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे म्हणून जोरदार धडपड सुरू केली आहे.

विधानसभेच्या चाळीसपैकी एकवीस जागा ज्या पक्षाला किंवा आघाडीला प्राप्त होतील, तो पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापन करू शकेल. काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक काल पणजीत घेतली. त्या बैठकीला विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार दिगंबर कामत उपस्थित होते. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही बैठकीत भाग घेतला. गोव्यात काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्या युतीचे सरकार स्थापन होईल असा दावा चोडणकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. भाजपला चाळीसपैकी दहाहून कमी जागा मिळतील असे चोडणकर म्हणाले. एकदा मतमोजणी जाहीर झाल्यानंतर लगेच पाच मिनिटांत आम्ही मुख्यमंत्री कोण ते निश्चित करू आणि दहा मिनिटांत राजभवनवर जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असे गेल्याच आठवड्यात चोडणकर म्हणाले होते.

काँग्रेसमध्ये मायकल लोबो हेही मुख्यमंत्रीपदाचे एक दावेदार आहेत पण शेवटी पक्ष काय निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे लोबो यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदासारख्या विषयांवर काँग्रेसचे निर्णय पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर होतील, असे कामत यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ७९ टक्के मतदान झाल्याने हे मतदान सरकारविरोधी असल्याचे सर्वसामान्यपणे गोव्यात मानले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मात्र भाजप २२ जागा जिंकेल व पुन्हा सरकार स्थापन करील असे म्हटले आहे. 

विजयी होण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात

भाजपमधील महत्त्वाकांक्षी नेते विश्वजित राणे यांनी डावपेच सुरू केले आहेत. भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी जर पाच-सहा दुसऱ्या पक्षाचे किंवा अपक्ष आमदार सोबत घ्यावे लागले तर ते संख्याबळ आपण आणू शकतो, असे विश्वजित राणे यांनी भाजपच्या काही नेत्यांना सांगितले आहे. राणे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा आहे याची कल्पना पक्षातील आमदारांना आली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तसेच काही संभाव्य अपक्ष उमेदवार (जे विजयी होण्याची शक्यता आहे) त्यांच्या संपर्कात विश्वजित आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष तीन जागा जिंकण्याची शक्यता असल्याने विश्वजित यांनी त्या पक्षाच्या नेत्यांशी संवाद वाढवला आहे. भाजपला बहुमत मिळाले नाही तर अपक्ष व म.गो. पक्षाच्या आमदारांना भाजपच्या बाजूने आणण्याचे कौशल्य विश्वजित राणे यांच्याकडे आहे. 

Web Title: Goa Assembly Election 2022: Vishwajit Rane's fielding for the post of Chief Minister in Goa before the election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.