Goa: सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन सुभाष फळदेसाई व कवळेकर यांच्यात जुंपली
By किशोर कुबल | Updated: May 9, 2024 16:12 IST2024-05-09T16:10:35+5:302024-05-09T16:12:37+5:30
Goa Assembly Election 2024: बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तसेच त्यांची पत्नी सावित्री यांचे निकटचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात कॉंग्रेसी उमेदवाराच्या विजयासाठी वावरले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावूनही भाजपविरोधात त्यानी काम केले, असा खळबळजनक आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला.

Goa: सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन सुभाष फळदेसाई व कवळेकर यांच्यात जुंपली
- किशोर कुबल
पणजी - सांगेत पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांवरुन मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच त्यांची पत्नी सावित्री यांच्यात बरीच जुंपली आहे.
बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तसेच त्यांची पत्नी सावित्री यांचे निकटचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात कॉंग्रेसी उमेदवाराच्या विजयासाठी वावरले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावूनही भाजपविरोधात त्यानी काम केले, असा खळबळजनक आरोप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला.
माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी या आरोपांना तात्काळ प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले कि, ‘ पक्षाप्रती माझी निष्ठा आणि वचनबध्दता पक्ष नेतृत्त्वाला तसेच तमाम गोवकरांना ठाऊक आहे. फळदेसाई यांना माझी निष्ठा किंवा पत यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. हताश व बोगस व्यक्तीकडून मला दाखल्याची गरज नाही.’ ते पुढे म्हणाले कि,‘ केपें मतदारसंघात कॉग्रेसचा आमदार आहे असे असूनही भाजपला तेथे मताधिक्क्य मिळेल.
माझे नाव नाहक गोवण्याचा प्रयत्न- निकालातून सर्व काही स्पष्ट होईलच
फळदेसाई हे नाहक माझे नाव घेऊन अपप्रचार करीत आहेत, असे सावित्री कवळेकर यांचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, ‘ या निवडणुकीत मी दिलेल्या योगदानाची पक्षाला बय्रापैकी कल्पना आहे. दक्षिण गोव्याची जागा भाजप उमेदवाराने जिंकावी यासाठी मी परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळे फळदेसाई यांनी केलेल्या निरर्थक आरोपांना मी स्पष्टिकरण देण्याची गरज नाही. निकालात काय ते स्पष्ट दिसून येईलच. फळदेसाई हे माझे नाव नाहक गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्ष नेतृत्त्वाने याची गंभीर दखल घ्यायला हवी.’