Goa Assembly Election: गोव्यात एनसीपी-सेनेची साेयरीक; काँग्रेस, राष्ट्रवादीचे संबंध संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 09:23 AM2022-01-19T09:23:30+5:302022-01-19T09:25:11+5:30
एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली.
पणजी : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंध गोव्यात मंगळवारी संपुष्टात आले. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची शिवसेनेशी सोयरीक झाली आहे.
एकूण चाळीसपैकी काही जागा काँग्रेसने आपल्याला सोडाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी प्रफुल्ल पटेल हे गोव्यात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. यापुढे काँग्रेसशी युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही, आम्ही स्वतंत्रपणे उमेदवार उतरवू, असे ते म्हणाले. काँग्रेसचे १५ आमदार गेल्या पाच वर्षांत सोडून गेले तरीही तो पक्ष स्वबळाची भाषा करतो, असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यात शिवसेनेसोबत युती झाल्याचे ते म्हणाले.