Goa Election 2022 : शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:45 PM2022-01-31T14:45:03+5:302022-01-31T14:45:54+5:30

Goa Assembly Elections: यापूर्वीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचं समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं.

goa assembly election shiv sena withdraws candidate from panajim to back manohar parrikar utpal parrikar | Goa Election 2022 : शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी

Goa Election 2022 : शिवसेनेने शब्द पाळला; उत्पल पर्रीकरांसाठी वेलिंगकर यांनी मागे घेतली उमेदवारी

googlenewsNext

Goa Assembly Elections: सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. यात गोव्याच्याही निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या नावाची खुप चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. उत्पल पर्रीकर यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने (Shiv Sena) आपल्या पणजी सीटवरील (Panjim Assembly Constituency) उमेदवार मागे घेतला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं उत्पल पर्रीकर यांनी पणजीहून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकर यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अन्य पक्षांनी त्यांना पाठींबा द्यावा, असं आवाहन केलं होतं. संजय राऊत यांनी पणजीमधून शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील टॅग केलंय.


"आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत. शिवसेनेचे पणजीचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. इतकंच नाही, आम्ही उत्पल पर्रीकर यांना पूर्ण समर्थन देऊ. पणजीची लढाई केवळ निवडणुकीपुरतीच नाही, तर गोव्याच्या राजकीय शुद्धीकरणाबाबत असल्याचं आमचं मानणं आहे," असं राऊत यांनी ट्वीटमध्ये नमूद केलंय. यासोबत त्यांनी उत्पल पर्रीकरांच्या एका वक्तव्यासोबतचा फोटोही जोडला आहे. "तुम्ही दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिनिधित्व केलेल्या निवडणूक क्षेत्रात गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकिट द्याल का?," असं त्यात लिहिलं आहे.

Web Title: goa assembly election shiv sena withdraws candidate from panajim to back manohar parrikar utpal parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.