गोवा विधानसभा निवडणूक येत्या मार्चला व्हावी - लक्ष्मीकांत पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2016 05:52 PM2016-08-01T17:52:21+5:302016-08-01T17:52:21+5:30
गोवा विधानसभेच्या निवडणुका येत्या मार्चमध्येच व्हायला हव्यात. निवडणुका तत्पूर्वी होऊ नयेत या भूमिकेशी सरकार ठाम आहे. आम्हाला लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलेले
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १ - गोवा विधानसभेच्या निवडणुका येत्या मार्चमध्येच व्हायला हव्यात. निवडणुका तत्पूर्वी होऊ नयेत या भूमिकेशी सरकार ठाम आहे. आम्हाला लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलेले आहे, असे निवेदन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे केले.
विधानसभा निवडणुका डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी होऊ शकतात, अशी माहिती काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या येथील कार्यालयाच्या सूत्रंकडून बाहेर आली. त्या अनुषंगाने पत्रकारांनी सोमवारी गुजच्या कार्यालयातील एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ते म्हणाले की आम्हाला पाच महिनेच नव्हे तर पाच आठवडे अगोदर देखील निवडणुका झालेल्या नको आहेत. आमच्या सरकारचा किंवा विधानसभेचा कार्यकाळ आम्ही कमी करू पाहत नाही. गेल्या 2012 साली झालेल्या निवडणुकीवेळी लोकांनी आम्हाला पाच वर्षासाठी निवडून दिले आहे. आम्हाला कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे मार्चमध्येच निवडणुका व्हाव्यात या मताशी आपण ठाम आहोत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भूमिका मांडलेली असली तरी, एकदा विधानसभेचा साडेचार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला की, मग कोणत्याही क्षणी निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार असतो, असे आयोगाच्या सुत्रंनी सांगितले. सहा महिने अगोदरही आयोग निवडणूक घेऊ शकतो. जानेवारी 2017 मध्ये निवडणुका होतील, अशी दाट शक्यता सुत्रंकडून व्यक्त केली जात आहे.