गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 11:59 AM2018-01-16T11:59:29+5:302018-01-16T12:38:10+5:30

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

In Goa, an attempt was made to revive the edge of anti-Maharashtra sentiment | गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

Next

पणजी : गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूने म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकविरुद्ध गोवा लढत असतानाच दुस-या बाजूने जनतम कौलास 50 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने गोव्यात महाराष्ट्राविरुद्ध टीकेचा सूर काही घटकांनी सुरू केला आहे. 

अशावेळी गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने बॅक सीट घेतलेले असले तरी, जनमत कौल दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्यास सरकारने पाठींबा दिला आहे. दुस-याबाजूने मराठीभाषा व संस्कृती तसेच भारतीयत्व अशा भावनांविषयी अधिक जागृत असलेल्या काही गोमंतकीयांनी जनतम कौलानिमित्त लावल्या गेलेल्या पोस्टर्सना विरोध चालविला आहे. काही घटकांनी मंगळवारी म्हापसा- पणजी मार्गावरील ब:याच पोस्टर्सना काळे फासून निषेध नोंदवला आहे.

डिसेंबर 1967 मध्ये गोवा पोतरुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला. लगेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे अशी मागणी पुढे आली. मात्र याचवेळी गोवा हे स्वतंत्र राष्ट्र असावे, ते महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा भाग बनू नये म्हणूनही प्रयत्न झाले. मात्र स्वातंत्र्यसैनिक तसेच अन्य घटकांनी या मागणीला जोरदार विरोध केला. गोवा हे भारताचेच एक स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी पुढे आली. महाराष्ट्रात विलीनीकरण हवा की नको हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला गेला. त्यामुळे गोवा महाराष्ट्रात विलिन होऊ शकला नाही. गोव्यातील ख्रिस्ती धर्मिय बांधवांना महाराष्ट्राची त्यावेळी भीती दाखवली गेली. गोवा महाराष्ट्राचा भाग झाला नाही यात गोव्याचे हितच आहे पण आता पुन्हा एकदा जनमत कौलाची पन्नास वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्राला दोष देण्याचा जोरदार प्रयत्न गोव्यात काही घटक करू लागले आहेत. यातून संघर्षाचे बिज सध्या पडले आहे. 

गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याची मागणी ज्या काळात आली होती, त्या काळची परिस्थिती अभ्यासकांनी लक्षात घ्यावी असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला. हा विलंब का लागला, त्यामागे कोणती कारणो होती तेही लक्षात घ्यावे, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत सत्तेत राहून तुम्ही जनमत कौल साजरा करणे हा दांभिकपणा झाला अशी टीका आम आदमी पक्षाने व शिवसेनेने गोवा फॉरवर्ड पक्षावर व भाजपवर केली आहे.

दरम्यान, गोवा सरकारने विलिनीकरणविरोधी दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. गोव्यातील गोवा फॉरवर्ड या पक्षाने सर्वत्र ओपिनियन पोल दिनाचे फलक लावले. या फलकावर मंत्री विजय सरदेसाई यांनी लावलेल्या स्वत:च्या छायाचित्राला काही गोमंतकीयांनी आक्षेप घेतला. काही अज्ञातांनी म्हापसा-पणजी मार्गावरील सर्व फलकांवर काळे फासल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. जनमत कौल साजरा करण्यासाठी भाजपने जास्त उत्साह दाखवलेला नाही पण गोवा फॉरवर्डने दाखवलेल्या उत्साहाचे स्वागत व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या भावना गोव्यात सध्या अनुभवास येत आहेत.

Web Title: In Goa, an attempt was made to revive the edge of anti-Maharashtra sentiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.