बुथ सशक्तिकरण अभियानाला सुरुवात; 'त्या' कार्यकर्त्यांना मिळणार बुथांवर स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:00 PM2023-02-22T16:00:13+5:302023-02-22T16:00:48+5:30

गोवा भाजप पक्षाने बुथ सशक्तीकरण अभियानाला सुरुवात केली आहे.

goa bjp launch of booth empowerment campaign and those workers will get a place on the booths | बुथ सशक्तिकरण अभियानाला सुरुवात; 'त्या' कार्यकर्त्यांना मिळणार बुथांवर स्थान

बुथ सशक्तिकरण अभियानाला सुरुवात; 'त्या' कार्यकर्त्यांना मिळणार बुथांवर स्थान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजप पक्षाने बुथ सशक्तीकरण अभियानाला सुरुवात केली आहे. दि. २४ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान हे अभियान राबवले जाईल. यावेळी कॉंग्रेस सोडून भाजपप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना तसेच जुन्या भाजप कार्यकर्त्यांना बुथ तसेच शक्ती केंद्रांमध्ये स्थान दिले जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत राज्यातील १ हजार ७२२ बुथ व ४८९ शक्ती केंद्र सशक्त केले जातील. काही बुथांची पुनर्रचनाही केली जाईल. यानिमित पणजी येथे पक्षाचे राष्ट्रीय नेते शिवकुमार यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच बुथ व शक्ती केंद्रांचे अध्यक्ष हजर होते, असे त्यांनी सांगितले.

गोव्यात माजी मंत्री तथा पक्षाचे नेते दयानंद सोपटे यांची बुथ सशक्तीकरण अभियानाच्या निमंत्रकपदी आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील. त्यादिशेने भाजपने बुथ व शक्ती केंद्र मजबूत करण्यावर भर दिला आहे. जाईल शक्ती केंद्रांचे विस्तारक हे केंद्र मजबूत करण्यावर भर जाईल. या शक्ती केंद्रांना सशक्त करण्यासाठी काय करावे यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. ४ फेब्रुवारी ते ५ मार्च असे दहा दिवस हे हे बुथ सशक्तीकरण अभियान चालणार असून त्याकाळात हे विस्तारक या केंद्रांना भेट देतील असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी लोकसभेत उत्कृष्ट असे भाषण केले. देशातील गरीब जनतेचे कल्याण तसेच अन्य विषयांवर त्यांनी यात भर दिला. राष्ट्रपतींचे हे भाषण राज्यातील सर्व बुथांवर कार्यकर्त्यांपर्यंत २० मार्च पर्यंत पोचवले जातील, असेही तानावडे यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे नेते दयानंद सोपटे, सिद्धार्थ कुंकळ्येकर व दामू नाईक उपस्थित होते..

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: goa bjp launch of booth empowerment campaign and those workers will get a place on the booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.