Goa: ब्लेडने स्वतचा गळा चिरला : ओडिशा येथील एका इसमाचा गोव्यात मृत्यू
By सूरज.नाईकपवार | Published: July 29, 2023 12:54 PM2023-07-29T12:54:52+5:302023-07-29T12:55:30+5:30
Goa Crime News: ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे.
- सूरज नाईक पवार
मडगाव - ब्लेडने स्वतचा गळा चिरल्याने एका ३८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. गोव्यातील कोलवा येथे वरील घटना घडली. राम बरला असे मयताचे नाव असून, तो मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवाशी आहे. कोलवा पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.
मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी वरील प्रकरण पोलिस दफ्तरी नोंदवून घेतले आहे. शुक्रवार दि. २८ रोजी वरील घटना घडली. मयताच्या पत्नीशी पोलिसांनी संपर्क साधून तिला घडलेल्या या घटनेबाबत माहिती दिली आहे.
मयत हा कामगार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवार दि. २७ जुलै रोजी तो गोव्यात आला होता. नंतर तो कोलवा येथील एका गेस्ट हाउसमध्ये राहायला आला. आपल्या खोलीच्या बाहेर त्याने ब्लेडने गळा चिरला. रक्ताचा फवारा उडाल्याने नंतर याबाबत त्या गेस्ट हाउसमधील कर्मचाऱ्यांना त्यासंबधीची माहिती मिळाली. लागलीच १०८ मदत सेवेच्या ॲम्बुलन्सला बोलावून जखमी राम बरला याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.