गोव्यात नववर्षाची धूम, नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची तोबा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 08:54 PM2017-12-30T20:54:03+5:302017-12-30T20:54:21+5:30
गोव्यात रविवारी 31 रोजी रात्री सर्वत्र नववर्ष साजरे करण्याची धुम असेल. नववर्षानिमित्त जोरदार पाटर्य़ा आणि संगीत रजनीचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत.
पणजी : गोव्यात रविवारी 31 रोजी रात्री सर्वत्र नववर्ष साजरे करण्याची धुम असेल. नववर्षानिमित्त जोरदार पाटर्य़ा आणि संगीत रजनीचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. विशेषत: किनारपट्टी आकर्षक रोषणाईने पूर्णपणो सजली व फुलली आहे. लाखो पर्यटकांच्या साक्षीने आज रात्री गोमंतकीय आणि पर्यटकही नववर्ष साजरे करतील.
गोव्यात सध्या जगभरातील लाखो पर्यटक आलेले आहेत. या शिवाय देशातील उद्योग जगतातील मान्यवरांसह राजकीय नेते, बॉलिवूडमधील सिने तारे, क्रिडापटू वगैरे गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी दाखल झाले आहेत. तारांकित हॉटेलांनी नववर्षाच्या स्वागतासाठी खास संगीताचे कार्यक्रम आणि मेजवान्या आयोजित केल्या आहेत. किनारपट्टीतील हॉटेलांमध्ये सध्या रिकाम्या खोल्याच उपलब्ध नाहीत. काही पंचतारांकित हॉटेलांमध्ये दि. 31 रोजी हॉटेल खोलीचा भाडेदर पन्नास ते ऐंशी हजार रुपये आहे. यात मेजवानी व अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांचे शुल्क आले. मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोंवरही आजची रात्र कार्यक्रमांनी गाजणार आहे. किनारपट्टीत वाहतुकही प्रचंड वाढली आहे. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ताण आलेला आहे. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर पर्यटकांची वाहने वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या अनुभवास येत आहे. श्ॉक व्यवसायिकांनीही दि. 31 रोजी रात्री किना:यांवर संगीताचे कार्यक्रम ठेवले आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरे राज्यांतील उद्योजक, आजी-माजी मंत्री तसेच काही निवृत्त न्यायाधीश नव वर्ष साजरे करण्यासाठी सहकुटूंब गोव्यात दाखल झाले आहेत. मिरामार, कांदोळी, कळंगुट, सिकेरी, बागा, मांद्रे, आश्वे, कोलवा, पाळोळे अशा किना:यांवर आज मध्यरात्री गोमंतकीय व पर्यटक जमून नववर्षाचे स्वागत करत असल्याचे चित्र पहायला मिळेल.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्यावर्षाचे स्वागत अशा टप्प्यावर राज्यात आनंदाचा माहोल आहे. सरकारचे प्रशासन अगोदरच सुट्टीच्या मूडमध्ये आहे. नाताळ सणापासून अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी रजेवर गेले आहेत. दि. 1 जानेवारीला ते रुजू होतील. नाताळानिमित्त शाळांना सुट्टी होती. दि. 2 जानेवारीपासून राज्यातील सगळी विद्यालये नव्याने खुली होतील.
नववर्षानिमित्ताने राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा व इतरांनी गोमंतकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.